आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच वेळी पाडता येतील 36 मिसाईल, 33000 कोटींत खरेदी करणार S-400 डिफेन्स सिस्टिम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशियाकडे असलेल्या या डिफेन्स सिस्टिमची जगभरात चर्चा आहे. काही मोजक्या देशांकडे असलेल्या डिफेन्स सिस्टिमच्या तोडीची ही आहे. - Divya Marathi
रशियाकडे असलेल्या या डिफेन्स सिस्टिमची जगभरात चर्चा आहे. काही मोजक्या देशांकडे असलेल्या डिफेन्स सिस्टिमच्या तोडीची ही आहे.
मॉस्को (रशिया)- S-400 अॅंटी मिसाइल डिफेन्स सिस्टिम खरेदी करण्यासाठी भारत सरकार लवकरच रशियासोबत महत्त्वपूर्ण करार करणार आहे. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन ब्रिक्स समिटसाठी शनिवारी गोव्याला येणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतीन यांच्यात या विषयावर चर्चा होऊन करार होण्याची शक्यता आहे. ही अॅंटी मिसाईल डिफेन्स सिस्टिम 400 किलोमीटर दूर अंतरावरुन येणाऱ्या 300 टारगेटवर हल्ला करु शकते. एवढेच नव्हे तर एकाच वेळी 36 मिसाईल्स पाडण्याची क्षमता या सिस्टिममध्ये आहे. पण यासाठी भारताला 33000 कोटी रुपये मोजावे लागतील.
यातून तीन प्रकारच्या मिसाईल फायर करता येतील
- S-400 अॅंटी मिसाइल डिफेन्स सिस्टिम रशियाचे अत्यंत आधुनिक डिफेन्स सिस्टिम आहे.
- भारताने अशा पाच सिस्टिम विकत घेण्यात रस दाखवला आहे. या सिस्टिममधून तीन प्रकारच्या मिसाईल सोडल्या जाऊ शकतात.
- तीनही मिसाईल्सचे फिचर्स वेगवेगळे आहेत. यातील संपूर्ण यंत्रणा संगणकाच्या माध्यमातून हाताळली जाते.
- भारतीय संरक्षण मंत्रालयाने गेल्या वर्षीच या खरेदीला हिरवी झेंडी दाखवली होती.
- पुतीन आणि मोदी यांच्या भेटीत संरक्षण खरेदी संदर्भात आणखी काही डिल्स होण्याची शक्यता आहे.
विमान आणि ड्रोनही पाडता येतील
- S-400 अॅंटी मिसाइल डिफेन्स सिस्टिमने विमान, मिसाईल्स आणि ड्रोनही पाडता येतील.
- रशियाने ही सिस्टिम सिरियात तैनात केली आहे.
- भारताने ही डील फायनल केली तर चीननंतर भारताकडेच ही सिस्टिम असेल.
- S-400 अॅंटी मिसाइल डिफेन्स सिस्टिमचे अपग्रेडेड व्हर्जन S-300 आहे. त्याचा समावेश रशियाने लष्करात केला आहे.
- रशियाची कंपनी Almaz-Antey ने याची निर्मिती केली आहे.
इतर कोणते करार होऊ शकतात
- भारतीय नौदलाकडून 11356 विमानवाहू जहाज यावरही करार होण्याची शक्यता आहे.
- या शिवाय कामोव Ka-226T हेलिकॉप्टर्स निर्मितीवर जॉईंट व्हेंचर पद्धतीने काम होऊ शकते.
- यासह संरक्षणाशी संबंधित लहान-मोठे करार होऊ शकतात.
- अनेक दशकांपासून रशियाला भारताला शस्त्रे पुरवत आला आहे. इतर देशांच्या तुलनेत अतिशय कमी किमतीला रशियाला भारताला शस्त्रे विकते.
पुढील स्लाईडवर बघा, S-400 अॅंटी मिसाइल डिफेन्स सिस्टिमचे काही फोटो.... काय आहेत फिचर्स... अखेरच्या स्लाईडवर बघा कशी काम करते ही डिफेन्स सिस्टिम... बघा फायरिंगचा लाईव्ह व्हिडिओ.....
बातम्या आणखी आहेत...