आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेमध्ये पुन्हा भारतीयावर हल्ला, केंट शहरात 39 वर्षीय शीख नागरिक जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
न्यूयॉर्क - अमेरिकेत वर्णद्वेषातून भारतीयांवर हल्ले होण्याच्या घटना सुरूच आहेत. नव्या घटनेत श्वेतवर्णीय व्यक्तीने केलेल्या गोळीबारात ३९ वर्षीय शीख नागरिक दीप राय जखमी झाले. वॉशिंग्टन स्टेटमधील केंट शहरात राय आपल्या घराबाहेर कार दुरुस्त करत असताना असताना एक हल्लेखोर त्याच्याजवळ आला आणि ‘तू तुझ्या देशात जा’, असे ओरडत  त्याने गोळी झाडली. हल्लेखोराने चेहरा झाकलेला होता. सुदैवाने या हल्ल्यातून राय बचावले.
 
अमेरिकेत भारतीय वंशाच्या नागरिकांवर सतत हल्ले होत आहेत. गेल्या महिन्यात कन्सासमध्ये ३२ वर्षीय अभियंता श्रीनिवास कुचिभोतला याची हत्या करण्यात आली होती. या आठवड्यात हरनिश पटेल हा स्टोअर मालक मृतावस्थेत आढळला होता. दहा दिवसांच्या आत हा तिसरा हल्ला आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...