आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: भारतीय जवानांनी जीव धोक्यात टाकून नेपाळमध्ये राबविले मदतकार्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातील कोणत्याही भागात नैसर्गिक संकट असेल आणि कितीही विपरित परिस्थिती असेल तरी भारतीय लष्कराचे जवान तेथे मदत कार्य राबवतात. यासाठी प्रसंगी आपला जीवही धोक्यात टाकतात. उत्तराखंडमधील भूस्खलन असो किंवा जम्मू आणि काश्मिरमध्ये आलेला विनाशकारी पूर. कोणत्याही प्रकारच्या संकटांवर मात करीत भारतीय लष्कराचे जवान मदत कार्य राबवतात.
आता तर अगदी देशाच्या सीमारेषा ओलांडत जवानांनी नेपाळमध्ये मदत कार्य राबविले आहे. त्यासाठी हवाई दलाची मदत घेतली जात आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यापासून दैनंदिन गरजेच्या वस्तू त्यांना पुरवण्यापर्यंत सर्वतोपरी मदत जवान करीत आहेत.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, भारतीय लष्कराच्या जवानांनी नेपाळमध्ये संकटात सापडलेल्या लोकांना कशी मदत केली...