आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुकरच्या नामांकन यादीत भारतीय लेखिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - कादंबरीलेखनातील प्रतिष्ठित बुकर पुरस्कारच्या प्राथमिक १३ जणांच्या यादीतील नामांकनात भारतीय लेखिका अनुराधा रॉय आणि भारतीय वंशाचे ब्रिटिश लेखक संजीव सहोता यांचा समावेश करण्यात आला आहे. पुरस्कार निवड समितीने या नावांची घोषणा बुधवारी केली.

राॅय यांची तिसरी कादंबरी ‘स्लीपिंग ऑन ज्युपिटर’ आणि सहोता यांच्या ‘द इयर ऑफ द रनअवेज’ कादंबरीला नामांकन मिळाले आहे. कादंबरीच्या निवड प्रक्रियेसाठीची चर्चा नेहमी शांततेत पार पडत नाही, मात्र त्यात सौहार्दपूर्ण वातावरण असते, असे निवड समितीचे प्रमुख मायकेल वूड यांनी सांगितले. या वेळी आलेल्या प्रवेशिकांतून असामान्य साहित्यकृती पाहायला मिळाली. लेखकांनी निवडलेल्या भाषेतील कादंब-यांचे विषय उत्साहवर्धक आहेत. ‘स्लीपिंग ऑन ज्युपिटर’ कादंबरीला विविध पुस्तक परीक्षणात चांगल्या साहित्यकृतीने
गौरवण्यात आले आहे. या कादंबरीतून भारतीय समाजातील ढोंगीपणा समोर आणला आहे. सहोता यांनी आपल्या कादंबरीत ब्रिटनमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय निर्वासितांची कथा सांगितली आहे. प्राथमिक यादीत अमेरिकी, ब्रिटिश,आयरीश, न्यूझीलंड, नायजेरिया आणि जमैकातील लेखकांचाही समावेश आहे. मार्लोन जेम्स नामांकन प्राप्त करणारे जमैकाचे
पहिले लेखक ठरले आहेत.

१३ ऑक्टोबर रोजी पुरस्कारांची घोषणा
लंडन येथील मॅन ग्रप ऑफिसमध्ये १५ सप्टेंबर रोजी प्राथमिक यादीतील सहा जणांची निवड जाहीर केली जाईल. यानंतर लंडनमधील गिल्ड हॉलमध्ये १३ ऑक्टोबर रोजी आयोजित कार्यक्रमात बुकर विजेता लेखक, लेखिकेच्या नावांची घोषणा केली जाईल. १९६९ मध्ये बुकर पुरस्कारला सुरुवात झाली. नामांकनप्राप्त प्रत्येक लेखकाला २५०० हजार पाउंड व त्यांच्या पुस्तकाची विशेष आवृत्ती काढली जाते. बुकर विजेत्यास पुरस्काराच्या रूपात ५० हजार
पाउंड मिळतात. गेल्या वर्षी रिचर्ड फ्लँगन यांच्या ‘द नॅरो रोड टू द डीप नॉर्थ’ कादंबरीच्या ब्रिटनमध्ये ३ लाख प्रती विकल्या आहेत. जगभरात तिच्या ८ लाख प्रती विकल्या.
छायाचित्र: अनुराधा रॉय