आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indian Born Bussinessman Shrien Devani Will Face Inquiry Again

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हनिमूनदरम्यान पत्नीची हत्या, भारतीय वंशाचे देवानी पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅनी आणि श्रेयन देवानी. - Divya Marathi
अॅनी आणि श्रेयन देवानी.
लंडन - हनिमूनदरम्यान पत्नीची हत्या केल्याच्या प्रकरणातून मुक्त झालेले ब्रिटिश-इंडियन करोडपती व्यावसायिक श्रेयेन देवानीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. श्रेयेन यांना पुन्हा एकदा चौकशीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. साऊथ अाफ्रिकेमध्ये हनिमूनदरम्यान पत्नीची हत्या केल्याच्या प्रकरणात श्रेयेन यांना अटक करण्यात आली होती. मात्र गेल्या वर्षीच त्यांची या प्रकरणातून सुटका करण्यात आली होती.

घटना अशी...
2010 मध्ये श्रेयेन देवानी त्यांची स्वीडीश-इंडियन पत्नी अॅनीबरोबर साऊथ अाफ्रिकेत हनिमूनसाठी गेले होते. त्यावेळी केपटाऊनच्या परिसरात 14 नोव्हेंबर रोजी या दाम्पत्यावर हल्ला फायरिंग झाली होती. त्यामध्ये 28 वर्षांच्या अॅनीचा मृत्यू झाला होता.

श्रेयेनवर आरोप
अॅनीचे वडील विनोद हिंदोचा आणि काका अशोक यांनी बुधवारी नॉर्थ लंडन कॉर्नर येथील कोर्टासमोर आपले म्हणणे मांडले. त्यावेळी त्यांनी, श्रेयेन देवानी यांची कायदेशीर चौकशी व्हावी अशी मागणी केली. तसेच त्यांच्या काही प्रश्नांची श्रेयेन यांनी उत्तरे द्यावी असेही म्हटले. मात्र, कॉरेनर (या प्रकरणाचा तपास करणारे) अँड्रूय वॉकरने अॅनीच्या कुटुंबीयांना सांगितले की, ज्या प्रश्नांमुळे ते दोषी ठरू शकतात त्यांची उत्तरे न देण्याचा अधिकार श्रेयेन यांना आहे.

काय म्हणाले वॉकर..
वॉकर म्हणाले, माझ्या मते सध्याच्या परिस्थितीत कुटुंबीयांनी कायदेशीर चौकशीची विनंती करून काहीही फायदा नाही. मात्र तसे असले तरी, कुटुंबीयांचे प्रश्न देवानी यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत. मात्र त्याची उत्तरे देणार की नाही, याबाबत देवानी यांनी अद्याप काहीही संकेत दिलेले नाहीत. गेल्या वर्षी देवानी यांनी साऊथ आफ्रिकेवरून इंग्लंडला आणण्यात आले होते. पण त्यांची निर्दोष मुक्तता झाली.

बायसेक्श्युअल असल्याचे केले होते श्रेयेन यांनी मान्य
कोर्टात सुनावणीदरम्यान श्रेयेन यांनी ते बायसेक्श्युअल असल्याचे स्वतः मान्य केले होते. पण तसे असले तरी पत्नीवर प्रेम असल्याचे ते म्हटले होते. सरकारी पक्षाच्या वतीने दावा करण्यात आला की, देवानी बायसेक्श्युअल होते आणि त्यामुळे ते हे नाते संपवण्याचा मार्ग शोधत होते. त्यामुळेच त्यांनी पत्नीची हत्या केली होती, असे सरकारी पक्षाचे म्हणणे होते.

अपु-या पुराव्यांमुळे सोडले
दक्षिण अाफ्रिकेच्या एका न्यायालयाने पुराव्यांच्या अभावामुळे श्रेयेन देवानी यांना मुक्त केले होते. कोर्टात सुमारे चार वर्ष हा खटला सुरू होता. वेस्टर्न केप हायकोर्टाने 34 वर्षांच्या देवानी यांनी स्वतः बचाव करण्यापूर्वीच त्यांच्यावरील आरोप फेटाळण्यात आले होते. न्यायाधीश म्हणाले होते की, देवानी यांच्या विरोधात दाखल केलेल्या खटल्यात पुरेसे पुरावे नाहीत. श्रेयेन यांच्यावर टॅक्सी चालक जोला टांगो, जिवामडोडा क्वाबे आणि शोलिले मगेनी यांना सुपारी दिल्याचा आरोप होता.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS