आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन दिवस चालला अब्जाधीशाच्या मुलाचा लग्नसमारंभ, परदेशी सुनेचा देसी स्टाइल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - ब्रिटनमध्ये राहणारे भारतीय वंशाचे अब्जाधीश महमूद कमानी यांच्या मुलाचा इटलीतील विवाह सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 28 वर्षीय मुलगा अदमने लेक कोमो येथे आपली गर्लफ्रेंड शरलॉट मॅकहेलशी विवाह केला. विवाह समारंभ चक्क 3 दिवसांपर्यंत सुरूच होता. यात शरलॉट वेडिंग गाउनसह इंडियन ड्रेसेसमध्ये सुद्धा दिसली. अदम यांचे आजोबा गुजरातहून आहेत. तसेच त्याच्या आजोबांनी महात्मा गांधींसोबत एकाच शाळेत आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. 
 

फॉरेनर वधू, देसी स्टाइल
- कमानी अदम 165 अब्जांचे फॅशन एम्पायर बुहूचे मालक आहेत. त्यांनी आपल्या मुलाच्या लग्नात 8 कोटी रुपये खर्च केले आहेत. 
- विवाहाचे सर्वच समारंभ लेक कोमो येथील 24 एकर खासगी पार्कलँड विला इब्रा येथे पार पडले. ही जागा कित्येक हॉलिवूडपटांमध्ये सुद्धा वापरण्यात आली आहे. 
- सलग तीन दिवस चाललेल्या या लग्न समारंभात फॉरेनर वधू चक्क देसी अवतारात दिसून आली. तर, लग्नसमारंभातील काही कार्यक्रमांत तिने प्रिंसेस गाउन आणि टिएरा (ताज) परिधान केला होता. 
- कुटुंबियांनी लग्नाचे फोटोज सोशल मीडियावर जाहीर केले आहेत. यात वधून आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत एन्जॉय करताना दिसून आली. 
- वधू शरलॉटने सुद्धा या समारंभाचे काही फोटोज शेअर केले आहेत. 
 

गांधींसोबत शिकत होते आजोबा
- महमूद मूळचे भारतीय असून ते गुजरातमध्ये राहत होते. येथून त्यांचा कुटुंब केनियात गेला आणि त्यानंतर ब्रिटनमध्ये स्थायिक झाला. 
- महमूद यांचे वडील अब्दुल्लाह गुजरातमध्ये महात्मा गांधींसोबत एकाच शाळेत जात होते. 
- महमूद यांनी बुहू चे बिझनेस 2006 मध्ये स्थापित केले होते. कमी किमतीत चांगल्या दर्जाचे आणि फॅशनेबल कपडे विकणे हे त्यांचे ध्येय होते. 
- आज घडीला मॅनचेस्टर, बर्नले, लंडन, न्युयॉर्क आणि लॉस एंजेलिसमध्ये त्यांचा 1415 लोकांचा स्टाफ आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, लग्न समारंभाचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...