आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेनंतर न्यूझीलंडमध्ये आता भारतीयांवर हल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
ऑकलँड - अमेरिकेनंतर आता न्यूझीलंडमध्येही वंशद्वेषाचे लोण पसरले आहे. एका भारतीयावर येथे हल्ला झाला. ऑकलँड शहरात भारतीय नरिंदरवीर सिंग यांच्यावर बुधवारी सायंकाळी हल्ला झाला. आपल्या कारमधून ते बाहेरची दृश्ये कॅमेऱ्यात टिपत असताना अचानक त्यांच्यावर हल्ला झाला. तुझ्या देशात चालता हो, असे हल्लेखोराने त्यांना बजावले.
 
सिंग यांनी या घटनेचे रेकॉर्डिंग केले. ही क्लिप त्यांनी फेसबुकवर पोस्ट केली. यात सिंग यांनी लिहिले की या व्यक्तीने त्यांना घृणास्पद शिव्या दिल्या. पंजाबी लोक वाईट असतात असे हल्लेखोर म्हणत होता. व्हिडिओमध्ये हल्लेखोर ग्रे एव्हरेस्ट टी शर्ट घातल्याचे दिसते. सिंग यांनी म्हटले की आपण यामुळे भयभीत झालो होतो. तो निघून गेल्यानंतर मला वाटले की मी सुटलोय. मात्र त्या व्यक्तीने मला पार्किंगमध्ये येऊन पुन्हा शिवीगाळ केली.  
 
यापूर्वी त्यांच्या दुसऱ्या भारतीय सहकाऱ्याला  अनुभव आला होता. त्यालादेखील गाडी चालवताना न्यूझीलंडच्या एका नागरिकाने म्हटले होते, ‘ वेगाने गाडी चालवायची असेल तर तुझ्या देशात चालता हो.’ बिक्रमने सांगितले की आपण सरासरी वेगाने गाडी चालवत होतो. मात्र संबंधित व्यक्तीने नंतर ई-मेल पाठवून त्यांना माफी मागितली होती. 
बातम्या आणखी आहेत...