आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय दुतावासावर अफगाणमध्ये हल्ला; दोन हल्लेखोरांना कंठस्थान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मजार शरीफ/ नवी दिल्ली- पठाणकोटमध्ये अतिरेक्यांचा कट उधळून लावतो ना लावतो तोच अफगाणिस्तानच्या मजार-ए-शरीफमध्ये भारतीय वाणिज्य दुतावासावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांची संख्या कळू शकली नाही. स्फोट आणि गोळीबाराचा आवाज दूरवर ऐकू येत होता.
रविवारी रात्री अतिरेक्यांनी हल्ला केला. या परिसरात काही राजकीय नेतेही राहतात. असे असले तरी, महावाणिज्य दूत बी.सरकार म्हणाले, गोळीबार जवळपास २० मिनिटे सुरू होता.

हल्लेखोरांनी इमारातीतून गोळीबार केला. मात्र, कोणीही दुतावासात प्रवेश करू शकला नाही. आम्ही सर्व सुरक्षित आहोत. या वाणिज्य दुतावासात तीन भारतीय कर्मचारी काम करतात. काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार हल्लेखोर चार होते. यातील दोघांना सुरक्षा दलाने ठार केले.

बल्ख राज्याच्या गव्हर्नरांचे प्रवक्ते मुनीर अहमद फरहाद म्हणाले, अतिरेकी दुतावासाजवळील इमारतीत लपून बसले होते. अंधाराचा फायदा घेत त्यांनी दुतावासात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक सुरू आहे. अफगाणिस्तानमध्ये भारतीय दुतावासावर याआधीही अतिरेकी हल्ले आहेत. काबुलमध्ये २००८ आणि २००९ मध्ये भारतीय दुतावासावर हल्ले झाले होते. त्यात डझनभर लोक ठार झाले होते.
बातम्या आणखी आहेत...