आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय वंशांच्या डॉक्टरचा अमेरिकेत मर्डर, पेशंटने पाठलाग करुन चाकून भोसकले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्सास - अमेरिकेतील कन्सास येथे मूळचे तेलंगणातील एका 57 वर्षांच्या डॉक्टरची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. हत्या झालेल्या डॉक्टरचे नाव अच्युता रेड्डी होते. ते मनोविकार तज्ज्ञ होते. इस्ट विचिता भागातील त्यांच्या क्लिनिकच्या मागील गल्लीमध्ये त्यांचा मृतदेह सापडला. हत्येच्या आरोपात भारतीय वंशाच्या एका अमेरिकन नागरिकाला अटक करण्यात आली आहे, त्याच्यावर फर्स्ट डिग्री मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तो डॉक्टरचा पेशंट असल्याची माहिती आहे. 
 
याच वर्षी फेब्रुवारीमध्ये तेलंगणातील एका भारतीय नागरिकाची हत्या करण्यात आली होती. श्रीनिवास कुछीभोटला असे त्याचे नाव होते. आता हे दुसरे प्रकरण आहे. अमेरिकन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराचे नाव उमर राशिद दत्त आहे. त्याने डॉक्टरसोबत चर्चा केली त्यानंतर त्याने चाकूने वार करुन डॉक्टरची हत्या केली. डॉक्टरने पळून जाण्याचा प्रयत्न केला तर उमरने पाठलाग करुन त्यांना भोसकले. उमर दत्तला कंट्री क्लब येथून अटक करण्यात आली, त्याची सुचना एका सेक्यूरिटी गार्डने दिली होती. 
 
डॉक्टर रेड्डी हे मानसोपचार तज्ज्ञ होते. होलिस्टिक नावाने त्यांचे क्लिनिक होते. ते योग आणि फिटनेस एक्सपर्ट होते. तेलंगणामधील नालगोंडा जिल्ह्यातील डॉ. रेड्डी यांना तीन मुले आहेत. दोन दशक प्रॅक्टिस केल्यानंतर त्यांनी स्वतःचे क्लिनिक सुरु केले होते. 
डॉ. रेड्डींच्या पत्नी बीना देखील डॉक्टर आहेत. डॉ. रेड्डींच्या एक पेशंट सिसिलिया स्मिथ यांनी एका चॅनलला सांगतिले की मी स्वतःला मारण्याचा प्रयत्न केला होता. डॉ. रेड्डी नसते तर आज मी नसते. 
बातम्या आणखी आहेत...