आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Earth plate Moves Under Nepal Earth plate In Last 81 Yrs

81 वर्षांत भारताची अर्थप्लेट नेपाळच्या अर्थप्लेटखाली 12 फुट सरकली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलंबिया/काठमांडू- गेल्या 81 वर्षांच्या काळात भारताची भूमी असलेली अर्थप्लेट नेपाळची भूमी असलेल्या अर्थप्लेटच्या खाली 12 फुट सरकली आहे, अशी माहिती कोलंबिया विद्यापिठाच्या द लॅमॉंट दोहर्ती अर्थ ऑब्जर्व्हेटरीमधील असोसिएट रिसर्च प्रोफेसर कॉलिन स्टार्क की यांनी दिली आहे. या बदलाने नेपाळच्या अर्थप्लेटवर मोठ्या प्रमाणावर ताण आला आहे. तो भूकंपाच्या रुपाने अधेमध्ये बाहेर पडत असतो.
भूकंपाने 10 फूट सरकले काठमांडू
कॉलिन यांनी सांगितले, की शनिवारी आलेल्या भूकंपात नेपाळच्या अर्थप्लेटमध्ये सुमारे 1,000 ते 2,000 वर्गमील परिसरात मोठी हालचाल झाली आहे. यामुळे काठमांडूपासून पोखरापर्यंतची जमिन हादरली. हा धक्का एवढा जोरदार होता, की काठमांडू तीन मीटर (10 फूट) सरकले. दरम्यान, जगातील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्टच्या भौगोलिक स्थितीत कोणताही बदल झालेला नाही.
20 हायड्रोजन बॉम्ब एवढा शक्तीशाली होता भूकंप
नेपाळ आणि भारतातील काही राज्यांमध्ये शनिवारी बसलेल्या भुकंपाचे धक्के तब्बल 20 हायड्रोजन बॉम्बएवढे होते, अशी माहिती मिळाली आहे. ब्रिटिश वेबसाईट 'दी इंडिपेंडंट'ने एका एक्सपर्टशी संपर्क साधून सांगितले आहे, की रिश्टर स्केलवर 7.8 तीव्रता असलेल्या या भूकंपाची ताकद 20 थर्मोन्यूक्लियर हाइड्रोजन बॉम्बएवढी होती. हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर अमेरिकेते टाकलेल्या अणूबॉम्बच्या अनेक पटीने हा शक्तीशाली होता.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, नेपाळमधील विदारक स्थिती... सर्वत्र दिसतात कोसळलेल्या इमारतींचे ढिगारे...