आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जंगली डुकराची शिकार करून खाल्ले मांस, आता अशा अवस्थेत आहे फॅमिली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - न्यूझीलंडमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या कोचुम्मेन कुटुंबातील 3 जण आता कोमातून बाहेर आले आहेत. दोन आठवड्यांपूर्वीच या कुटुंबियांनी जंगलात पिकनिकवर असताना जंगली डुकराची शिकार केली होती. त्याच डुकराचे मांस खालल्यानंतर कोचुम्मेन कुटुंबीय कोमात गेले होते. 

 

कोमातून बाहेर येताच फॅमिलीबद्दल विचारले...
> डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, 35 वर्षीय शिबू कोचुम्मेन, पत्नी सुबी आणि आई अलेकुट्टी डॅनिएलने दोन आठवड्यांपूर्वी डुकराचे मांस खाल्ले होते. तेव्हापासूनच ते कोमात होते. 
> डॉक्टरांनी त्यांना पक्षाघात झाल्याची शक्यता वर्तवली होती. यानंतर ते कोमात गेल्याचे निष्पन्न झाले. दोन दिवसांपूर्वीच शिबु आणि त्याची आई अलेकुट्टी यांनी डोळे उघडले. आता पत्नी सुद्धा कोमातून बाहेर आली आहे. 
> न्यूजीलंड हेराल्ड दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, शुद्धीवर येताच सुबीने सर्वप्रथम आपल्या फॅमिलीबद्दल विचारले. 
> सुबीची जीभ तिची साथ देत नाही. तिला बोलण्यात अडथळे येत आहेत. तरीही तिचे बोलणे लक्ष देऊन ऐकल्यावर समजत आहे. 
> त्यांनी ज्या डुकराचे मांस खाल्ले ते विषारी होते. पिकनिकवर या कुटुंबातील दोन चिमुकल्या देखील होत्या. मात्र, त्या झोपेत असल्याने त्यांनी मांस खाल्ले नाही. त्या दोघीही सुखरूप आहेत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या घटनेशी संबंधित आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...