आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेत भारतीय चिमुकलीचा मृतदेह बाथटब आढळला, सावत्र आई ताब्‍यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - तीन महिन्‍यांपूर्वी अमेरिकेला गेलेल्‍या एका नऊ वर्षीय भारतीय मुलीचा मृतदेह बाथटबमध्‍ये आढळला. विशेष म्‍हणजे मुलीच्‍या शरीरावर जखमा आहेत. त्‍यामुळे खून केल्‍याच्‍या संशयातून पोलिसांनी मृत मुलीच्‍या सावत्र आईला ताब्‍यात घेतले आहे. अशदीप कौर असे मृताचे नाच आहे. दरम्‍यान, या घटनेमुळे भारतात असलेल्‍या तिच्‍या सख्‍ख्‍या आईला मोठा मानसिक धक्‍का बसला आहे.
वडील आणि सावत्र आईसोबत राहत होती अशदीप...
> तीन महिन्‍यापूर्वी अशदीप भारतातून न्यूयॉर्कला गेली होती. ती क्वींस परिसरात वडील सुखजिंदर आणि सावत्र आई अर्जुन समधी पारदास यांच्‍यासोबत राहत होती.
> ते राहत असलेल्‍या अपार्टमेंटमध्‍ये एक जोडपेसुद्धा राहत होते. त्‍यांनी आरोप केला की, अशदीप ही शुक्रवारी तिच्‍या सावत्र आईसोबत बाथरूममध्‍ये गेली. काही वेळाने तिची आई बाथरूममधून बाहेर आली. पण, अशदीप आली नाही.
> पारदासने अशदीपची गळा घोटून हत्या केल्‍याचाही आरोप त्‍यांनी केली.
बाथटबमध्‍ये नव्‍हते पाणी
> पोलिसांच्‍या माहितीनुसार, अशदीपचा मृतदेह ज्‍या बाथटबमध्‍ये आढळला त्‍यात पाणी नव्‍हते. या घटनेनंतर पारदास फरार झाली. पोलिसांनी शोध मोहीम राबवून तिला ताब्‍यात घेतले.
> अशदीपला तिची सावत्र आई नेहमीच मारहाण करत असे, असा आरोप अशदीपच्‍या नातेवाइकांनी केला.
> अशदीपचे काका मनजिंदर सिंह म्‍हणाले, अशदीपने माझ्याकडे अनेक वेळा आपल्‍या सावत्र आईची तक्रार केली होती.
> अशदीपची आई भारतात राहत असून, मुलीच्‍या मृत्‍यूमुळे तिला मोठा मानसिक धक्‍का बसला आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, संबंधित फोटोज....