आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूझीलंड : पत्नीने शेफला झाेडपले; उच्चायुक्त भारतात परत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न/नवी दिल्ली - न्यूझीलंडमधील भारतीय उच्चायुक्त रवी थापर यांच्या पत्नी शर्मिला यांनी स्वयंपाक्याला गुलामासारखी वागणूक देऊन मारहाण केल्याचे प्रकरण तापले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने थापर यांना मु‌ख्यालयात माघारी बाेलावले.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी दिलेल्या माहितीनुसार १० मे राेजी उच्चायुक्तालयातील एक कर्मचारी बेपत्ता असल्याचे उघडकीस आल्यावर हे प्रकरण समाेर आले.

उच्चायुक्तालयाने पाेलिस आणि दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयाला त्याची माहिती दिली. थापर यांच्या पत्नी शर्मिला यांनी निवासस्थानी स्वयंपाकी असलेल्या कर्मचार्‍यास गुलामासारखी वागणूक दिली आणि मारझाेड केली. त्यामुळे तेथून ताे पळून गेला. २० किलाेमीटर पायपीट करून ताे खिन्न बसला असताना एका नागरिकाचे त्याच्याकडे लक्ष गेले. नंतर त्याला पाेलिसात नेण्यात आले. त्यानंतर अनेक दिवस ताे वेलिंग्टनमधील निवार्‍यात राहिला.
बातम्या आणखी आहेत...