आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत आणखी एका भारतवंशीयाची हत्या, दोन गटांच्‍या गोळीबारामध्‍ये गोळी लागून मृत्‍यूमुखी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - अमेरिकेत आणखी एका भारतवंशीयाची गोळी झाडून हत्या करण्यात आली. खंडू पटेल (५८) हे सोमवारी रात्री एका मोटेलबाहेर फिरत होते. त्याच दरम्यान ते दोन गटांमध्ये सुरू झालेल्या गोळीबाराच्या तडाख्यात सापडले. ही घटना टेनेसी प्रांतात झाली. 
 
 
हॉटेलबाहेर फेरफटका मारत असताना लागली गोळी
- खांडू पटेल बेस्‍ट व्‍हॅल्‍यु इन अँण्‍ड सुइट्स हॉटेल हाऊसकीपरचे काम करत होते.
- ही घटना सोमवारी घडली. हॉटेलसमोर दोन गटांत गोळीबार चालू असताना खांडू पटेल हॉटेलच्‍या मागे उभे होते. तेथेच त्‍यांना छातीत एक गोळी लागली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
- खांडू पटेल बेस्‍ट व्‍हॅल्‍यु इन हॉटेलमध्‍ये 8 महिन्‍यांपासून काम करत आहेत. पत्‍नी आणि दोन मुलांसह ते याच हॉटेलमध्‍ये राहत होते.
- खांडू यांचा पुतणा जय पटेलने माहिती दिली की, 'हॉटेलमधील काम आटपून ते हॉटेलजवळच फेरफटका मारत होते. तेव्‍हाच त्‍यांच्‍या छातीत गोळी लागली. उपचारासाठी त्‍यांना तातडीने हॉस्पिटलमध्‍ये पाठवण्‍यात आले. मात्र तोपर्यंत त्‍यांचा मृत्‍यू झाला होता.'  
 
शिफ्ट होणार होते कुंटुब
- खांडू पटेल आपल्‍या कुटुंबसोबत लवकरच मिसीसिपी येथे शिफ्ट होणार होते, अशी माहिती जय पटेल यांनी दिली.  
- फायरिंग कोणी केली? याचा तपास चालू असल्‍याचे पोलिसांनी सांगितले आहे.
- क्राइम स्‍टॉपर्स विंगने याची माहिती देण्‍यासाठी मोठे बक्षिसही जाहीर केले आहे.
 
2 महिन्‍यांत 5 भारतीयांचा मृत्‍यू
- अमेरिकेत मागील दोन महिन्‍यात 5 भारतीयांची हत्‍या करण्‍यात आली आहे. यामध्‍ये तीन भारतीय गोळी लागून मृत्‍यूमुखी पडले तर 2 भारतीयांची गळा चिरुन हत्‍या करण्‍यात आली. 
- सर्वात प्रथम 22 फेब्रुवारीला कंसास येथे भारतीय इंजिनियर श्रीनिवासन कुचिबोथला यांची हत्‍या झाली. एका नौदल अधिका-याने, 'आमच्‍या देशातून चालते व्‍हा', असे म्‍हणत श्रीनिवासन यांना गोळी मारली होती.
- 2 मार्च राजी दक्षिण कॅरोलिना येथे हरनिश पटेल यांना घरात घुसून गोळी मारण्‍यात आली.    
- 23 मार्चला न्‍यू जर्सी येथे 38 वर्षांच्‍या शशिकला नर्रा आणि त्‍यांच्‍या 6 वर्षीय मुलाचा मृतदेह त्‍यांच्‍या अपार्टमेंटमध्‍ये आढळला होता. गळा चिरुन त्‍यांची हत्‍या करण्‍यात आली होती.  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)  
बातम्या आणखी आहेत...