आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Married Indonesian Woman, Accepted Islam, Now Cheated Her

इंडोनेशियातील 2 मुलांच्या आईशी लग्न, इस्लाम स्वीकारला, आता दिला दगा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- येथील एक तरुणाने इंडोनेशियाच्या महिलेला फ्रेंड केले. दोघे प्रेमात पडले. प्रेमाचे रुपांतर लग्नात झाले. त्यानंतर तिच्याकडून 10 हजार रुपये, डायमंडचे दागिने घेऊन तरुण जयपुरला परतला. दुसऱ्या लग्नाची तयारी केली. आता या तरुणीने जयपुरच्या महिला पोलिस ठाण्यात संबंधित तरुण, त्याचे वडील नरेंद्र शर्मा आणि आई ममता शर्मा यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी सांगितले, की या प्रकरणाला 2013 मध्ये सुरवात झाली. चांदपोल परिसरातील आकाश शर्मा इंडोनेशियाची राजधानी जकार्तामधील ब्राइट स्टार डायमंड कंपनीत काम करीत होता. त्याने फेसबुक अकाऊंटवर इंडिया इंडो भारत ग्रुप जॉईल केला. या ग्रुपवर जकार्तात राहत असलेली अनिता पुर्विता सारी हीही होती. जून 2013 मध्ये दोघांमध्ये मैत्री झाली. दोघांचे चॅटिंग, मॅसेज, वॉट्सअॅप आणि नंतर फोन कॉल्स सुरु झाले. गाठीभेटी सुरु झाल्या. आकाशने सारीला प्रपोज केले.
सारीचा घटस्फोट झालाय, आहेत दोन मुले
लग्न होण्यापूर्वी सारीने आकाशला सांगितले होते, की माझे यापूर्वी एकदा लग्न झाले आहे. आता माझा पतीसोबत घटस्फोट झाला आहे. मला दोन मुले आहेत. त्यानंतरही आकाश लग्नाला तयार झाला. 12 जानेवारी 2015 रोजी तो भारतात परतला. काही दिवसांनी त्याने सारीला फोन केला. पासपोर्ट हरवल्याचे सारीला सांगितले. सारीने सांगितले, की डुप्लिकेट बनवून घे तर तो म्हणाला, आई वडीलांनी घरात बंद करुन ठेवले आहे. माझा पासपोर्ट काढून घेतला आहे. सारी म्हणाली, की मी भारतात येते. त्यानंतर भीतीने आकाश पुन्हा इंडोनेशियाला आला.
इस्लामी पद्धतीने केले लग्न, धर्म बदलला
आकाश आणि सारी यांनी जकार्तात इस्लामी पद्धतीने लग्न केले. त्यानंतर सारीच्या कुटुंबीयांनी सांगितल्याप्रमाणे धर्मही बदलला. भारतीय दूतावासात लग्नाची नोंदही केली.
खोटे बोलून आला जयपुरला
आकाशने सांगितले, की माझ्या वडीलांची प्रकृती खराब झाली आहे. त्यांच्यावर उपचार करायचे आहेत. मला पैशांची गरज आहे. मला जयपुरला जायचे आहे. आता सारी भारतात आली आहे. तिने आकाशविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, आकाशने केली दुसऱ्या लग्नाची तयारी.... बघा दोघांच्या लग्नाचे फोटो...