आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूकंप: भारतीय मिडिया कव्हरेजवर नेपाळ सरकार नाराज, ट्रेंडमध्ये #GoHomeIndianMedia

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडू- नेपाळमधील भूकंपमदतीच्या दरम्यान भारतीय माध्यमांनी केलेल्या जाहिरातबाजीवर नेपाळ सरकार नाराज झाले आहे. बचावकार्य जवळपास संपले आहे त्यामुळे एनडीआरएफच्या पथकांनी येथील कार्य थांबवावे असे सांगण्यात आले आहे. नेपाळमधील पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे की, आणखी मदतकार्याची गरज नाही. उर्वरित काम आम्ही पार पाडू शकतो असे अप्रत्यक्ष सुचित केले आहे. दरम्यान, एनडीआरएफने हे वृत्त फेटाळून लावत सर्वच परदेशी मदतसंस्थांना मायदेशी परतण्याचे आदेश दिल्याचे एनडीआरएफने स्पष्टीकरण दिले आहे.
रविवारी भारत सरकारच्या जाहिरातबाजीवर व एनडीआरएफच्या मदतीबाबत भारतीय माध्यमांनी केलेल्या वार्तांकनावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. हा हॅशटॅग रविवारी नेपाळमध्ये टॉपवर ट्रेंड करीत होता. अखेर नेपाळ सरकारने सोशल मिडियाची दखल घेत भारतीय मिडियाबाबत नाराजी व्यक्त केल्याचे मानले जात आहे. भारताच्या एनडीआरएफ तुकड्यांकडून नेपाळमधील भूकंप पिडितांना केली जात असलेली मदत थांबविण्यास सांगण्यात आले आहे. खुद्द नेपाळ सरकारचीच तशी इच्छा असल्याचे सूत्रांकडून कळते आहे.
नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपानंतर भारताने राबविलेल्या 'ऑपरेशन मैत्री'ची जगभर कौतूक झाले. दरम्यान, रविवारी टि्वटरवर संपूर्ण दिवस #GoHomeIndianMedia टॉपवर ट्रेंड करीत होते. सोशल मीडिया यूजर्सनी आरोप केला आहे की, भारतीय माध्यमे एकतर्फी कव्हरेज करीत आहेत. भूकंपाच्या सर्व बातम्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रित केले जात आहे. सर्व बातम्यात मोदींचे नाव कसे राहील हे भारतीय माध्यमे पाहत आहेत. या हॅशटॅगला 80 हजारपेक्षा जास्त वेळा रिटि्वट केले गेले आहे. सोशल मीडियाचा आरोप आहे की, 25 एप्रिलला नेपाळमध्ये आलेल्या भूकंपानंतर भारतीय माध्यमांनी संवेदनशीलपणे वार्तांकन करणे अपेक्षित असताना एकतर्फी केले आहे. नेपाळमधील काहींनी असाही आरोप केला आहे की, भूकंप कव्हरेज आणि भूकंप पीडितांना भारतीय मीडियाने भारत सरकारच्या बाजूने वार्तांकन करीत एक 'पब्लिक रिलेशन' इवेंटप्रमाणे सादर केले आहे. नेपाळ भूकंपात आतापर्यंत 7 हजार लोकांचा बळी गेला आहे व 14 हजारांहून अधिक जखमी झाले आहे.
खाली पाहा, मोजकी टि्वट्स ज्यात भारतीय मिडियावर ताशेरे ओढले आहेत नेटिझन्सनी..
@KC_Prasanna
An indian news reporter to a mother who's learnt her only son has been buried under their house. Q. How do you feel?
@iGarima1
Dear @narendramodi See even indians r ashamed of ur media.If u do have some selfrespect left then plz call back ur media Sincerely Nepalese
@iGarima1
Dear @narendramodi Our Dharahara have been fallen not our sovereignty! Sincerely Nepalese.
@_shomy
All the journos of private media houses lack minimum human ethics.They can go beyond any extent for PR & TRPs.
@nanditathhakur
I shared how irresponsible Indian reporters were while reporting Nepal tragedy not surprised Nepalese are trending.
@kapsology
Every propaganda has a expiry date. So does Modi's & Indian Media's.
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, टि्वटर पर पोस्ट केलेल्या निवडक प्रतिक्रिया...