आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोवळ्या मुलीची शिकार करणार होता हा वासनांध, असा अडकला जाळ्यात...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - ब्रिटनमध्ये एका भारतीय बँकरला पेडोफिल हंटर (लहान मुलांवरील अत्याचार विरोधी) पथकाने रंगेहात अटक केली आहे. तो एका 14 वर्षीय मुलीला सेक्ससाठी भेटायला शेकडो किमी दूर बरमिंघमला गेला होता. त्याने संबंधित मुलगी आणि आपल्यासाठी एक रुम बुक केली होती. एवढेच नव्हे, तर तो कंडोमचा बॉक्स देखील घेऊन गेला होता. तेवढ्यात त्याच्या हॉटेलच्या रुमवर पेडोफिल हंटरचा समूह धडकला. पथकाला पाहून त्याला काहीच सुचेनासे झाले होते. त्याने ढसा-ढसा रडण्यास सुरुवात केली. या सर्व प्रकार पेडोफील हंटर्सनी फेसबूकवर लाइव्ह स्ट्रीम केला आहे. 

कोण आहे आरोपी..? 
आरोपीचे नाव बालचंद्रन कवुंगलपरमबथ (38) असून तो ब्रिटनमध्ये सिटीबँक येथे बिझनेस मॅनेजर पदावर कार्यरत होता. त्याने इंटरनेटवरून एका 14 वर्षीय आभासी मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. कित्येक दिवस तिला अश्लील मेसेजेस पाठवत होता. त्याच्या व्हॉट्सअॅप मेसेजचे स्क्रीनशॉट देखील पोलिसांनी जारी केले. बँकेला त्याच्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्याला कामावरून काढण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून गंभीर कलमा लावण्यात आल्या आहेत.
 
 
पेडोफिल हंटर्सबद्दल...
पेडोफिल हंटर्स ग्रुप ब्रिटन सरकार आणि पोलिसांनी समाजवेसींच्या मदतीने तयार केला आहे. यात आभासी अल्पवयीन मुले मुलींच्या प्रोफाइल तयार केल्या जातात. त्यांना येणाऱ्या फ्रेन्ड रिक्वेस्ट आणि यानंतर होणाऱ्या चॅटिंगवर लक्ष ठेवले जाते. समोरची व्यक्ती पेडोफिल (लहान मुला-मुलींवर अत्याचार करण्याच्या प्रवृत्तीची) असल्यास त्याला सापळा रचून रंगेहात पकडले जाते. अनेकवेळा लहान मुला-मुलींनी पालकांना अशा लोकांची माहिती दिल्यानंतर पालक या समूहाशी संपर्क साधतात आणि त्यांनाही रंगेहात पकडले जाते. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, त्याने अल्पवयीन मुलीला केलेले चॅट आणि तो व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...