आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय वंशांच्या ड्रायव्हरला ऑस्ट्रेलियाच्या बसमध्ये जिवंत जाळले, AAP चा होता कार्यकर्ता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्विन्सलँड - भारतीय वंशाच्या एका बस ड्रायव्हरला ऑस्ट्रेलियामध्ये जिवंत जाळण्यात आले आहे. ही घटना ब्रिसबेनमधील मोरुका येथे घडली आहे. येथील ड्रायव्हर मनमीत अलीशेर यांच्यावर एकाने हल्ला केला. तेव्हा बसमध्ये इतरही प्रवाशी होते. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे, मात्र हल्ला का करण्यात आला त्याचे कारण कळु शकलेले नाही. मनमीत मुळचे पंजाबमधील होते. गायक आणि विदेशात आम आदमी पार्टीचे कार्य करीत होते.
पोलिस म्हणाले - वर्णद्वेशातून हल्ला नाही
- पोलिसांच्या माहितीनुसार, बसमधील एका प्रवाशाने मनमीत यांच्यावर ज्वलनशील पदार्थ फेकला होता. या हल्ल्यात आग लागली आणि त्यात होरपळून मनमीत यांचा मृत्यू झाला.
- बसमध्येही आग लागली होती. त्यात बसलेले प्रवासीही आगीत अडकण्याची शक्यता होती.
- ही घटना घडली तेव्हा बसमधील प्रवाशांनी मागील दरवाजा उघडून जीव वाचविला.
- पोलिसांनी ४८ वर्षीय एका व्यक्तीला अटक केली आहे.
- पोलिस अधिकारी जिम कियोग म्हणाले, या घटनेमागे आरोपीचा काय उद्देश होता, हे अद्याप कळू शकलेले नाही.
- पोलिसांनी म्हटले आहे, की दहशतवादी किंवा वर्णद्वेशातून हल्ला झाल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाही.
भारतीय समुदायाची मदत करीत होते मनमीत
- २९ वर्षांचे मनमीत ब्रिसबेन येथील पंजाबी समाजातील प्रसिद्ध नाव होते. ते प्रसिद्ध गायक देखील होते.
- मनमीत त्यांचा व्यवसाय सांभाळून भारतीय समाजाच्या मदतीसाठी धावून जाणेर व्यक्तीमत्व होते, असे त्यांना ओळखणारे सांगतात.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...