आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अमेरिकेतून चालती हो' म्हणत अफ्रो-अमेरिकन व्यक्तीने भारतीय वंशाच्या मुलीला रेल्वेत धमकावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - अमेरिकेत भारतीय वंशांच्या नागरिकांना लक्ष्य करण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वाढ होत चालली आहे.  भारतीय इंजिनिअर श्रीनिवास कुचीभोतलाच्या हत्येचे प्रकरण ताजे असताना एका भारतीय वंशाचा मुलीला अमेरिकेतून चालती हो असे सुनावण्यात आले आहे. एक अफ्रिकी-अमेरिकनने रेल्वेने प्रवास करणाऱ्या एकता देसाईला अमेरिकेतून निघून जाण्यासाठी खडसावले. 
 
- अमेरिकेतील कन्सास येथे भारतीय इंजिनिअर श्रीनिवास यांची एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याने 22 फेब्रुवारी रोजी गोळ्या झाडून हत्या केली होती. 
- याशिवाय एका भारतीय वंशाच्या व्यक्तीच्या घरावर अंडी फेकली गेली. घरात एक चिठ्ठी फेकून अमेरिकेतून निघून जाण्याची धमकी दिली होती. 
 
अफ्रिकी 'फ्रिडम ऑफ स्पीच' आणि 'ब्लॅक पॉवर' सारखे शब्द वापरत होता... 
-  अमेरिकेत भारतीय वंशाच्या मुलीवर वर्णद्वेषी टिप्पणी करण्यात आली.
-  न्यूयॉर्कमध्ये राहाणारी एकता देसाई रेल्वेने प्रवास करत होती. एका अफ्रो-अमिरकन व्यक्तीने तिला अमेरिकेतून चालती हो असे खडसावले.
- एकतासोबत झालेल्या दुर्व्यवहाराचा व्हिडिओ द व्हाइस रेजर या वेबसाइटने शेअर केला आहे. 
- व्हिडिओमध्ये दिसते, की अफ्रिकन व्यक्ती एकताला बरेच भले-बुरे बोलतो. त्यासोबतच त्याने 'फ्रिडम ऑफ स्पीच' आणि 'ब्लॅक पॉवर' सारख्या शब्दांचा वापर केला होता. 
- एकताने स्वतः हा व्हिडिओ तयार केला आहे. त्यानूसार अफ्रिकी व्यक्ती तिच्यावर संतप्त झालेला दिसतो.
 
एकताने सोशल मीडियावर सांगितले... 
- एकताने लिहिले आहे, 'मला ज्या ठिकाणी जायचे होते, या व्यक्तीलाही तेथेच जायचे होते.'
- 'तो माझ्यासमोर आला. माझ्या चेहऱ्याकडे पाहात काहीतरी म्हणू लागला.'
- मी हेडफोन लावलेले होते त्यामुळे तो काय म्हणतो ते कळू शकले नाही. 
- तो काय म्हणाला हे कळू शकले नाही आणि मी त्याला काही प्रतिक्रियाही दिली नाही. 
- एकताने या प्रकरणाची पोलिसात तक्रार दिली आहे. 
एका कार्यकर्त्याने केली मदत 
- या घटनेनंतर एकताने एका मानवाधिकार कार्यकर्त्याची भेट घेतली. द व्हाइस रेजर संघटनेचे संस्थापक कुंदन श्रीवास्तव यांनी एकताला मदत केली. 
- कुंदन श्रीवास्तव म्हणाले, एका महिलेला सर्वांसमोर अपशब्द वापरल्याबद्दल अफ्रो - अमेरिकन व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे. त्याला कडक शासन कसे होईल याचा अमेरिका सरकारने विचार केला पाहिजे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...