आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय वंशाची हुमा मिळवतेय अमेरिकेतील निवडणुकीत सर्वाधिक वेतन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंगटन - भारतीय वंशाच्या हु मा अाबदीन अमेरिकेत 2016 मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यपद निवडणुकीच्या प्रचारात सर्वाधिक सॅलरी मिळवणारी कर्मचारी ठरली आहे. फेडरल इलेक्शन कमिशनने जारी केलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी आणि राष्ट्रपती पदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या कँपेनची जबाबदारी हुमावर आहे. ‘हिलरी फॉर अमेरिका’ या कँपेनसाठी हुमाला पहिल्या तिमाहीसाठी 69,263.09 अमेरिक डॉलर (सुमारे 44 लाख रुपये) वेतन मिळाले आहे. सर्व उमेदवारांच्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत हे वेतन सर्वाधिक आहे.

विशेष बाब म्हणजे क्लिंटन कँपेनचे चेअरमन जॉन पोडेस्टा यांना केवळ 3,586 अमेरिकन डॉलक, कँपेन मॅनेजर रॉबी मूक यांना 27,625 अमेरिकन डॉलर आणि कम्युनिकेशन डायरेक्टरला 31,710 अमेरिकी डॉलर मिळाले आहेत. त्यानुसार हुमाचे वार्षिक वेतन 2,77052.36 होते.

हुमाचे वडील सय्यद जनुअल आबदीन भारतीय होते. तर आई पाकिस्तानी होती. हुमा यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्रपती अँथनी विनर यांच्याशी विवाह केला आहे. स्थानिक वेबसाईट पॉलिटिकोच्या रिपोर्टनुसार हुमा हिलरी यांच्याऐवजी त्यांच्या बैठकांमध्ये सहभागी होते, तसेच संपूर्ण कँपेनची जबाबदारीही सांभाळते. बहुतांश ठिकाणी हुमा स्वतःच निर्णय ङेते. गेल्या दोन वर्षांपासून हुमा हिलरी यांच्याबरोबर काम करत असल्याची माहिती मिळाली आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS
बातम्या आणखी आहेत...