आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian PM Narendra Modi Statue Inaugurated In London

मादाम तुसाँ संग्रहालयात नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे अनावरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेणाच्या पुतळ्याचे प्रसिद्ध मादाम तुसाँ संग्रहालयात गुरुवारी अनावरण करण्यात आले. मोदी यांनी गेल्या आठवड्यात पुतळ्याचे निरीक्षण करून संमती दिल्यानंतर पुतळा संग्रहालयात स्थापन करण्यात आला. बराक ओबामा, डेव्हिड कॅमेरून, अँजेला मर्केल, फ्रान्सवा ओलांद या जागतिक नेत्यांसमवेत मोदींचा पुतळा स्थिरावला आहे.

संग्रहालयात महात्मा गांधी, विन्स्टन चर्चिल यांचाही पुतळा आहे. मोदी यांनी पुतळा निर्मितीच्या प्रक्रियेत सुरुवातीपासून रस घेतला होता. निर्मिती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मादाम तुसाँच्या टीमने कौतुक करत असामान्य काम केल्याचे म्हटले होते. पंतप्रधान माेदी गेल्या आठवड्यात पुतळा पाहू शकले, याचा आम्हाला आनंद झाल्याचे संग्रहालयाचे महाव्यवस्थापक एडवर्ड फुल्लर यांनी सांगितले. मोदींच्या पुतळ्याला क्रीम रंगाचा कुर्ता, जॅकेट घालण्यात आला असून ते नमस्कार करत असल्याची पारंपरिक मुद्रा दाखवण्यात आली आहे.