आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

US: भारतीय इंजिनियरची गोळी झाडून हत्या, हल्लेखोर म्हणाला, माझ्या देशातून चालते व्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनिवास कुचीभोतला - Divya Marathi
श्रीनिवास कुचीभोतला
वॉशिंग्टन- अमेरिकेत कान्सासमधील एका बारमध्ये भारतीय इंजिनियरची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. 'माझ्या देशातून चालते व्हा', असे हल्लेखोर गोळी झाडताना म्हटल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. श्रीनिवास कुचीभोतला असे मृत इंजिनियरचे नाव आहे. त्याचा मित्र आलोक मदसानी हा या घटनेत जखमी झाला आहे. या घटनेत आणखी एक जण जखमी झाला आहे. एफबीआयसोबत चौकशी सुरु असल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे.

यूएस नेव्हीच्या कर्मचार्‍याने झाडली गोळी... 
- ओलेथमधील ऑस्टिन बार अॅण्ड ग्रिलमध्ये ही घटना घडली. 
- गोळी झाडणार्‍या हल्लेखोराचे नाव अॅडम पुरिन्टन (51) असे असून तो यूएस नेव्हीचा माजी कर्मचारी आहे.
- न्यूयॉर्क डेलीच्या रिपोर्टनुसार, भारतीय इंजिनियरवर गोळी झाडण्यापूर्वी पुरिन्टन म्हणाला की, 'माझ्या देशातून चालते व्हा.' 
- पोलिसांनी सांगितले की, पुरिन्टन नशेत तर्रर्र होता. 
- बारमध्ये बसलेल्या इतर लोकांवर कमेंट करत होता.
- पुरिन्टनला वाटले की, शेजारी बसलेले दोघे (श्रीनिवास कुचीभोतला आणि आलोक मदसानी) मिडल ईस्टचे आहेत.
- यात इयान ग्रिलट नामक व्यक्तीही जखमी झाला आहे.

ग्रिलट याची 'फेसबुक पोस्ट' प्रकाशित
- 'कन्सास सिटी स्टार सिटी' वृत्तपत्राने या घटनेतील जखमी ग्रिलट याची 'फेसबुक पोस्ट' कोट म्हणून प्रकाशित केली आहे.
- घटना घडली तेव्हा ग्रिलट हा बारमध्ये उपस्थित होता. तो दोन्ही भारतीयांच्या पाठीशी उभा होता. 
- ग्रिलट गोळी झाडणार्‍या अॅडम पुरिन्टनच्या मागील टेबलवर बसला होता. 
- रिपोर्टनुसार, पुरिन्टनने झाडलेली गोळी ग्रिलटच्या खाद्याला चाटून गेली. काही कळण्याच्या आता दोन्ही भारतीयांपैकी एक (श्रीनिवास) गतप्राण झाला होता. 
- एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, ग्रिलट याने बारमध्ये निर्माण झालेला वाद मिटवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. माझ्या देशातून चालते व्हा, असे पुरिन्टन गोळी झाटताना म्हणाला होता. 

कोण श्रीनिवास कुचीभोतला?
- श्रीनिवास कुचीभोतला याने 2014 मध्ये टेक्सास यूनिव्हर्सिटीतून इलेक्ट्रीकल अॅण्ड  इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगची पदवी घेतली होती. 
- गार्मिन इंटरनॅशनल कंपनीत तो नोकरी करत होता.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, आरोपी अॅडम पुरिन्टन याला पोलिसांनी केली अटक 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...