आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इराकमध्ये दोन वर्षापासून राहतोय हा शीख, ISISने त्रस्त यजिदींसाठी ठरला देवदूत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रवी सिंग पीडितांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करत आहेत. - Divya Marathi
रवी सिंग पीडितांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करत आहेत.
इंटरनॅशनल डेस्क- मानवतेपेक्षा कोणताही मोठा धर्म नाही. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे रवी सिंग आहे, जो भीषण हिंसाचाराने त्रस्त असलेल्या इराकमधील पिडीतांची मदत करत आहेत. येथील लोक दहशतवादी संघटना आयएसआयएसची क्रुरता पाहून देश सोडून पळून जात आहेत. तर, रवी सिंग त्यांच्यासाठी खाण्या-पिण्याची व्यवस्था करत आहेत. गेल्या दोन वर्षापासून इराकमधील यजिदी फॅमिलीसाठी रवी सिंग एक देवदूत बनले आहेत....
- ब्रिटनमध्ये राहणारे 47 वर्षीय रवी सिंग मूळचे भारतीय आहेत.
- वर्ष 2014 मध्ये आयएसने उत्तरी इराकवर हल्ला केला होता तेव्हा तेथे राहणा-या यजिदी लोकांना सिंजर पर्वतावर शरण जावे लागले होते.
- यजिदी समुदायाचे लोक सिंजर पर्वतावर अन्न-पाण्यावाचून तडपडत होते.
- रवी सिंग यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी थेट इराक गाठले.
- त्यावेळी अन्न-पाण्याने तडपडत असलेल्या यजिदीं लोकांसाठी रवी सिंग एक देवदूतच बनून आले.
- त्यांनी यजिदी लोकांच्या खाण्यापिण्यासह टेंटची सुद्धा व्यवस्था केली होती.
- आयएसच्या भीतीला न घाबरता रवी सिंग आताही सुमारे 400 शरणार्थिची सेवा करत आहेत.
बीबीसी वर्ल्ड न्यूजने बनवली डॉक्युमेंट्री-
- ब्रिटनची एक संस्था खालसा एडचे सीईओ रवी सिंग सांगतात, या लोकांना शीख धर्माबाबत काहीही माहिती नाही.
- त्यांना फक्त हे माहित आहे की मी भारतीय आहे आणि त्यांच्या मदतीसाठी पोहचलो आहे.
- यजिदी समुदायात ते इतके लोकप्रिय झाले आहेत की सर्वत्र केवळ त्यांचीच चर्चा आहे.
- रवी सिंग सांगतात, मी शेवटच्या श्वासापर्यंत यांची सेवा करत राहणार, भले मग माझा जीव का जाईना.
- मी या लोकांत मागील काही महिन्यांपासून आहे आणि ते माझे परिवार झाले आहेत.
- माझ्यासाठी यापेक्षा मोठा आनंद काहीही नाही. मला पाहताच हे लोक इतके खुलतात की ते मी शब्दात सांगू शकत नाही.
- एवढेच नव्हे तर, रवी सिंग सध्या जगभर चर्चेत आले आहेत.
- बीबीसी वर्ल्ड न्यूजने त्यांच्यावर एक डॉक्युमेंट्री तयार केली आहे ज्याचे शीर्षक आहे ‘द सेल्फलेस शीख’...
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...