आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Soldiers Remembers Indian Sweet During World War Also

महायुद्धात भारतीय मिठाईचे चर्वितचर्वण, जवानांना लागायची घराची ओढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - घरगुती मिठाई आणि खाद्यपदार्थ ही भारतीयांची खासियतच. म्हणूनच परदेशी भूमीवर शत्रूशी दोन हात करतानादेखील मिठाईची आठवण काढणारे असंख्य जवान होते. पहिल्या महायुद्धात भारतीय जवानांना घराची आेढ लागायची.

‘फॉर किंग अँड अनादर कंट्री
इंडियन सोल्जर्स ऑन द वेस्टर्न फ्रन्ट १९१४-१८’ या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी सायंकाळी झाले. जागतिक युद्धात पाश्चात्त्यांच्या बाजूने लढणाऱ्या भारतीय जवानांच्या मानसिकतेचा वेध या पुस्तकातून घेण्यात आला आहे. भारतीय जवानांनी तनामनाने लढाई करावी यासाठी काही सूचनांचा विचार ब्रिटिश साम्राज्याकडून करण्यात आला होता. भारतातून काही पदार्थ खास मागवण्यात यावेत किंवा ‘खीर’, ‘शेवया’ फ्रान्समध्ये तयार करण्यात याव्यात, अशा त्या सूचना होत्या. त्याची चर्चा आणि आकर्षण बेल्जियमच्या सैनिकांमध्ये होती.

पहिल्या फळीत भारतीय
ब्रिटिशांकडून लढणाऱ्या सैनिकांमध्ये भारतीयांचा सर्वाधिक समावेश होता. भारतीयांची संख्या सुमारे १५ लाखांच्या आसपास होती. या महायुद्धात भारतीय जवान पहिल्या फळीत प्राणाची बाजी लावून लढत होते, असे पुस्तकात नमूद करण्यात आले आहे.

श्रावणी बसूंचे लेखन
लेखिका श्रावणी बसू यांनी महायुद्धाचा काळ आणि तेव्हाच्या परिस्थितीचा दोन-अडीच वर्षे अभ्यास करून पुस्तकाचे लेखन केले. श्रावणी यांनी रेजिमेंटच्या डायरी, लष्करी अधिकाऱ्यांचे तत्कालीन दस्तऐवज, पत्रव्यवहार, सैनिकांचा पत्रव्यवहार, मुलाखती इत्यादींचा ब्रिटिश लायब्ररीतून धांडोळा घेत संशोधन केले.

१० वर्षांची मुलेही

पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांनी १० वर्षांच्या भारतीय मुलांनाही लढायला भाग पाडले होते. भारतीय सैनिक घरापासून हजारो मैल दूर लढत होते. ऑक्टोबरमध्ये अनेक भारतीय सैनिकांना युद्धभूमीवर दाखल व्हावे लागले होते. त्या वेळी युरोपात कडाक्याची थंडी पडली होती. त्यांच्या अंगावर कोट नव्हते. कोट येण्यासाठी डिसेंबर महिना उजाडला होता. भारतीयांना ब्रिटीश नर्सची सेवा घेण्यास परवानगी नव्हती, असे श्रावणी यांनी स्पष्ट केले.