आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

US मध्ये अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; भारतीय अॅथलीट अटकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- 12 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्यापच्या आरोपाखाली एका भारतीय अॅथलीटला अटक करण्‍यात आली आहे. तनवीर हुसेन (24) असे आरोपीचे नाव असून तो काश्मीरमधील  
राहाणारा आहे.

सारानेक येथे वर्ल्ड स्नोशू चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी तनवीर हुसेन आला आहे.
मोठी कसरत केल्यानंतर तनवीरला यूयॉर्कचा व्हिसा मिळाला होता. अटक झाल्यामुळे तनवीरचे करियर धोक्यात आले आहे. तनवीरवर अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आणि तिचे भविष्य उद्धवस्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

अमेरिकन दुतावासाने नाकारला होता व्हिसा...
- दिल्लीतील अमेरिकन दुतावासाने तनवीर आणि अॅथलीट आबिद खानचा व्हिसा नाकरला होता.
- दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सत्तेच आल्यानंतर त्यांनी सात मुस्लिम देशांमधील नागरिकांना अमेरिकेत येण्यास बंदी घातली होती.
- मात्र, त्यात भारताचा समावेश नव्हता. तनवीर आणि आबिद खान याला व्हिसा नाकरण्यामागे ट्रम्प यांच्या निर्णयाचे कारण अधिकार्‍यांनी पुढे केले होते.

पीडितेच्या आई-वडिलांनी नोंदवला गुन्हा...
- पोलिस सार्जंट केसी रियर्डन यांनी सांगितले की, पीडितेच्या आई-वडिलांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
- एडिरोन्डॅक डेली एंटरप्राइजच्या वृत्तानुसार, ही घटना सोमवारी सारानेक येथे घडली होती. पोलिसांनी हुसेनला बुधवारी अटक केली.
- पोलिसांनी तनवीरला कोर्टात हजर केले असता, लेव्हिस येथील एसेक्स काउंटी तुरुंगात त्याची रवानगी झाली आहे.
- येत्या 6 मार्चला या प्रकरणी कोर्टात सुनावणी होईल.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...