आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यास मारहाण, वर्णद्वेषी शिवीगाळ; जोडप्‍यावर गुन्‍हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो.. - Divya Marathi
फाईल फोटो..
मेलबर्न - ऑस्ट्रेलियातील जोडप्याने २५ वर्षीय भारतीय विद्यार्थ्यास मारहाण आणि वर्णद्वेषी शिवीगाळ केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. मारहाणीमध्ये पीडित गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
प्रदीप सिंग नामक हा विद्यार्थी ऑस्ट्रेलियाच्या तस्मानियामध्ये हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत, टॅक्सी चालवण्याचेही काम करतो. शनिवारी रात्री त्याच्या टॅक्सीमध्ये एक युवक आणि युवती बसली. त्यांना मॅकडोनाल्ड्स रेस्टाॅरंटला जायचे होते.

दरम्यान, युवतीला वांती येत होती. तिने धावत्या कारचा दरवाजा उघडून वांती केली. वास्तविक ऑस्ट्रेलियामध्ये रस्त्यावर घाण केल्यास स्वच्छता शुल्क भरावे लागते. प्रदीपने तिला धावत्या कारमधून वांती करण्याची विनंती केली आणि कार रस्त्याच्या कडेला घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर युवती भडकली आणि तिने वर्णद्वेषी शिव्या दिल्या. तिच्या मित्राने लाथाबुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. दरम्यान, काही लोकांनी त्या युवकास अडवले आणि जखणी प्रदीपला रॉयल होबार्ट रुग्णालयात दाखल केले.
 
बातम्या आणखी आहेत...