आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Techie Dies After Falling From Third Floor Of The Building In Australia

फोनवर बोलणे बेतले जिवावर, तिसऱ्या मजल्यावरुन पडून भारतीय IT कर्मचाऱ्याचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी (ऑस्ट्रेलिया)- भारतात असलेल्या पत्नीशी फोनवर बोलत असताना तोल गेल्याने ऑस्ट्रेलियातील भारतीय आयटी अॅनॅलिस्ट तरुणाचा तिसऱ्या मजल्यावरुन पडून दुर्दैवी मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी अशीच पण थोडी वेगळी घटना घडली होती. एक महिला बंगळुरुमधील पतीसोबत बोलत असताना अज्ञात व्यक्तीने वार करुन ठार मारले होते.
स्थानिक पोलिसांनी सांगितले, की या तरुणाचे नाव पंकज सॉ असे आहे. स्थानिक वेळेप्रमाणे सकाळी 1 वाजता पत्नीशी बोलत असताना तो बाल्कनीतून पडला. त्यानंतर इमरजन्सी सर्व्हिसेसला याची माहिती देण्यात आली. त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
बाल्कनीतून पडला तेव्हाच त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. शिवाय शरीराच्या आतही रक्तस्त्राव झाला होता.
पुढील स्लाईडवर बघा, या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडला तरुण... वर्ल्डकपची मॅच बघताना पंकज सॉ...