आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian VVIP Chopper Scam: Italian Court Sentences Former CEOs To Two Years Prison,

व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळा; दोघांना कैद, इटली न्यायालयाचा निवाडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिलान / नवी दिल्ली - व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर सौद्यात भ्रष्टाचार आणि बनावट दरपत्रक तयार केल्याच्या आरोपात दोषी ठरल्याने इटलीतील न्यायालयाने दोन कंपन्यांच्या माजी प्रमुखांना कैद ठोठावली आहे. भारतासोबत १२ हेलिकॉप्टरच्या सौद्यात हा घोटाळा झाला होता.
इटलीतील संरक्षण क्षेत्रातील आघाडीची कंपनी फिनमॅक्केनिकाचे माजी प्रमुख जी. आेरसी आणि सहकारी कंपनी ऑगस्ट वेस्टलँडचे माजी प्रमुख बर्नो स्पेगनोलिनी यांना शिक्षा झाली आहे. आेरसी यांना साडेचार वर्षे आणि स्पेगनोलिनी यांना चार वर्षे तुरुंगात काढावी लागणार आहेत. सरकारी वकिलांनी आेरसी यांच्यासाठी सहा आणि स्पेगनोलिनी यांच्यासाठी पाच वर्षांच्या शिक्षेची मागणी केली होती. फिनमॅक्कनिकाने या निवाड्यावर काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. परंतु कंपनीचे अधिकारी म्हणाले, हे प्रकरण जुने आहे. जुने अधिकारी राहिलेले नाहीत. फिनमॅक्कनिका आता तशी कंपनी राहिलेली नाही. त्यात पूर्णपणे बदल झाला आहे. दोन्ही माजी संचालकांनी प्रकरण समोर येताच २०१४ मध्ये पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्यावर भारतात सुमारे हजार २५० कोटी रुपयांच्या कंत्राटात सरकारची फसवणूक केल्याचा आरोप होता. कनिष्ठ न्यायालयाने ऑक्टोबर २०१४ मध्ये दोघांची भ्रष्टाचाराच्या आरोपातून सुटका केली होती, परंतु बनावट दरपत्रक दिल्याच्या प्रकरणात दोघांना दोन वर्षांची शिक्षा झाली होती.