आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काबूलमध्ये भारतीय महिलेचे अपहरण; दोन्ही देशांचा तपास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबूल - अफगाणिस्तानच्या राजधानीत भारतीय महिला ज्युडिथ डिसुझा यांचे गुरुवारी अपहरण झाले. अपहरणामागे संशयित दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय आहे. उशिरापर्यंत अपहरणाची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही.

ज्युडिथ यांचे काबूलच्या तैमानी भागातून अपहरण झाले आहे. त्या नोकरीच्या ठिकाणावरून घरी परतताना ही घटना घडली. त्यांच्यासोबत अन्य दोघांचेही अपहरण झाले आहे. भारतीय दूतावासाचे अधिकारी अफगाणी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. ज्युडिथ यांची तत्काळ सुटका व्हावी यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. कोलकात्याच्या ४० वर्षीय ज्युडिथ एनजीआे आगा खान फाउंडेशनसाठी काम करतात. ही एनजीआे ३० देशांत काम करते. अफगाणिस्तानात २००२ पासून ग्रामीण विकास, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता व सांस्कृतिक संरक्षण इत्यादी क्षेत्रांत ही संस्था कार्य करते. ज्युडिथ गेल्या वर्षी जुलैमध्ये अफगाणमध्ये सामाजिक कार्यात सक्रिय झाल्या होत्या. त्यांचे कुटुंबीय ३० वर्षांपासून कोलाकात्यात राहते. प्रशासनाकडून तपासाला सुरुवात झाली आहे. ज्युडिथ यांच्या सुरक्षित सुटकेसाठी प्रयत्न केले जात असल्याचे आगा खान फाउंडेशनने म्हटले आहे.

गेल्या महिन्यात इशारा
केंद्र सरकारने गेल्या महिन्यात भारतीयांनी काबूल किंवा अफगाणमध्ये प्रवास करू नये, असा इशारा जारी केला होता. अफगाणिस्तानातील परिस्थिती अतिशय वाईट बनली आहे. देशात राहणाऱ्या परदेशी नागरिकांवरील हल्ल्यांत वाढ झाली आहे. परदेशींचे अपहरण केले जात आहे. त्यांना आेलीस ठेवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रवासात सावधगिरी बाळगावी, असे सरकारने म्हटले होते.

ज्युडिथ भारतकन्या, सुटकेचे प्रयत्न सुरू : स्वराज
ज्युडिथ यांची बहीण एग्नेस यांनी ट्विटरवरून पोस्ट करून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मदतीची मागणी केली होती. त्या म्हणाल्या, माझी बहीण ज्युडिथचे काबूलमध्ये अपहरण झाले आहे. तिची लवकर सुटका व्हावी. माझे वृद्ध माता-पिता चिंतित पडले आहेत. त्यावर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज म्हणाल्या, त्या तुमची बहीण आहेत आणि भारताची मुलगी आहे. आम्ही त्यांना सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. सरकार ज्युडिथ यांच्या कुटुंबाच्या सतत संपर्कात आहे. ज्युडिथ यांचे वडील डी. डिसुझा म्हणाले, आम्हाला ज्युडिथ, तिचा वाहनचालक व सुरक्षा रक्षक यांच्या अपहरणाची बातमी ऐकायला मिळाली होती. मला माझी मुलगी हवी आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...