आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी पाहिलाय का असा जीव, भारतीय महिलेने अमेरिकेतून केले ट्वीट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ही छायाचित्रे प्रीति देसाई यांच्या ट्विटर पोस्टवरून घेण्यात आली आहेत. - Divya Marathi
ही छायाचित्रे प्रीति देसाई यांच्या ट्विटर पोस्टवरून घेण्यात आली आहेत.
इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेच्या हार्वे येथे आलेल्या इरमा चक्रीवादळानंतर टेक्सास प्रांतात असा गूढ प्राणी समुद्र किनाऱ्यावर वाहून आला. भारतीय वंशाच्या प्रीति देसाई यांनी तो फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट करत जीव शास्त्रज्ञांना प्रश्न विचारला की हा जीव आहे तरी कोण? त्यांनी आपल्या ट्वीटसह संबंधित सजिवाचे फोटोज सुद्धा टाकले आहेत. 
 

काय म्हणाले तज्ञ?
- त्यांची विनंती जीव शास्त्रज्ञ आणि मासे तज्ञ डॉक्टर केनिथ टिघे यांना पाठवण्यात आली. त्यांनी हा सागरी जीव प्रत्यक्षात तीक्ष्ण दातांचे 'स्नेक-ईल' असल्याचे स्पष्ट केले. 
- त्यांनी म्हटल्याप्रमाणे, ते एक गार्डेन किंवा कांगर ईल सुद्धा असू शकते. या सजिवाच्या तीन जाती आहेत. विशेष म्हणजे, ते तिन्ही प्रकार टेक्सासमध्ये आढळून येतात. सर्वांचे दात असेच तीक्ष्ण असतात. 
- इरमा चक्रीवादळात आलेल्या पुरानंतर हा जीव सागरी किनाऱ्यावर येऊन पडला असावा असे म्हटले जात आहे.
- तीक्ष्ण दातांच्या स्नेक ईल समुद्रात 30 ते 90 मीटर खोलीवर राहतात. 
 
 
अटलांटिक महासागरात वास्तव्य
अटलांटिक महासागरात सापडणाऱ्या या सागरी जीवाला टस्की ईल म्हणूनही ओळखल्या जाते. चक्रीवादळानंतर झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी प्रीति देसाई सागरी किनाऱ्यावर गेल्या होत्या. त्याचवेळी त्यांनी हा जीव पाहिला आणि कुतूहल दूर करण्यासाठी त्याची छायाचित्रे काढून ट्वीटरवर पोस्ट केली. सागरात अगदी 90 मीटर खोलमध्ये राहणारा हा जीव चक्रीवादळानंतर बाहेर कसा आला हे अजुनही स्पष्ट झालेले नाही. 
 
 
म्हणून केले ट्वीट... 
प्रीति देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले, की यापूर्वीही कित्येक संशोधक आणि तज्ञ मंडळी आपल्या शंका दूर करण्यासाठी ट्वीटर किंवा इतर सोशल माध्यमांचा आधार घेतात. ट्वीट करण्याचा फायदा असा झाला की लगेच मला माझ्या मित्रांनी फोन करून याबाबतची माहिती दिली. डॉक्टर टिघे यांनीही त्या सजिवाची सविस्तर माहिती दिली. अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यासाठी सोशल मीडिया एक उत्तम व्यासपीठ आहे.
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज....
बातम्या आणखी आहेत...