आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकी पुरुषांपेक्षा भारतवंशीय महिला वरचढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- भारतीय वंशाच्या महिलांची कमाई आशियाई-अमेरिकन पुरुषांहून अधिक आहे यावर तुमचा कदाचित विश्वासही बसणार नाही, परंतु एका अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे.
भारतासह आशियातील महिलांनी पूर्णवेळ नोकरी करून २०१४ मध्ये आठवड्याला ६८० डॉलर्सची कमाई केली होती. स्पेन किंवा लॅटिन अमेरिकन पुरुषांना त्या वेळी सरासरी ६१६ डॉलर्सची कमाई करता आली होती, असे ब्युरो ऑफ लेबर स्टॅटेस्टिक्सच्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीत नमूद करण्यात आले आहे. अर्थतज्ज्ञ मार्क पेरी यांनी आपल्या ब्लॉगमध्येही आशियाई वंशाच्या महिलांच्या आठवड्याच्या सरासरी कमाईवर काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली होती. त्यांच्या मते, आशियाई महिला आठवडाभर पूर्णवेळ नोकरी करून सरासरी ८४१ डॉलर्सची कमाई करते, तर पुरुष ८७१ डॉलर्स करतात. अर्थात, काही वेळा पुरुषांच्या बरोबरीनेदेखील कमाई करण्याची संधी त्यांना मिळते, असे पेरी यांचे म्हणणे आहे.

व्यावसायिकांची संख्या
आशियाई वंशाच्या महिलांनी शिक्षणातही बाजी मारली आहे. अमेरिकेतील एकूण आशियाई महिलांपैकी २१.८ पदवीधर किंवा व्यावसायिक आहेत. परंतु त्यात पुरुषांचे प्रमाण मात्र केवळ १२.८ टक्के एवढेच आहे. अर्थात, आशियाई महिला या क्षेत्रात वरचढ ठरल्याचा दावा अहवालातून करण्यात आला आहे.

दबदबा वाढला : अमेरिकेतील प्रशासनात भारतीयांची छाप आहे. आता शिक्षण आणि व्यावसायिक पातळीवरदेखील देशाचा दबदबा वाढल्याची ही चिन्हे आहेत.

उच्च शिक्षणात अग्रेसर
भारतीय-अमेरिकी महिलांनी उच्च शिक्षणात देशाचा नावलौकिक वाढवला आहे. ७२ टक्के महिलांकडे ४ वर्षांची पदवी आहे. ४० टक्के महिला व्यावसायिक असून त्या पदवीधरदेखील आहेत. अर्थात, अमेरिकन पुरुषांच्या तुलनेत भारतीय-अमेरिकी महिला पदवीत अग्रेसर आहेत, असे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ च्या एका वृत्तात म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...