आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदीमध्ये घराला आग लागून 10 भारतीयांचा होरपळून मृत्यू, सुषमांनी अधिकाऱ्यांना केले रवाना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई/नवी दिल्ली - दुबईतील नजरान शहरातील एका घराला लागेल्या आगीत 10 भारतीयांचा होरपळून मृत्यू झाला आहे. 6 लोक जखमी आहेत. केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी गुरुवारी ट्विट करुन या घटनेची माहिती दिली. त्या म्हणाल्या, की मंत्रालय सौदीतील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. त्याचबरोबर सुषमांनी भारतीय अधिकाऱ्यांना त्वरीत सौदीला रवाना होण्याच्या सूचना केल्या आहेत. त्या म्हणाल्या, 'भारतीय अधिकारी नजरानचे गव्हर्नर प्रिन्स जलूवी बिन अब्देलाजीज यांच्या संपर्कात आहेत.'
 
घराला नव्हती एकही खिडकी 
- नजरान येथील ज्या घराला आग लागली त्या घराला एकही खिडकी नव्हती अशी माहिती समोर येत आहे. 
- सौदी सिव्हिल डिफेन्सचे म्हणणे आहे, की येथे राहाणारे सर्वजण कन्स्ट्रक्शन कंपनीचे कामगार आहेत. 
- या घरातील जूनाट एअरकंडिशनमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
 
साऊथ आशियाचे 90 लाख कामगार 
- प्रिन्स जलूवी यांनी सिव्हिल डिफेन्स, नगरपालिका प्रशासन आणि फिल्ड टीम यांच्या कामाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, 'कन्स्ट्रक्शन कंपन्यांनी कामगारांना योग्य ठिकाणी राहाण्याची व्यवस्था केली पाहिजे. अशा बिल्डिंग किरायाने घेऊन तिथे कामगारांना ठेवणे धोकादायक आहे. विदेशातील कामगारांवर यंत्रणांचे लक्ष नसल्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला.'
- सौदी अरेबियाच्या कंपन्यांमध्ये साऊथ आशियामधून जवळपास 90 लाख कामगार गेलेले आहेत. 
बातम्या आणखी आहेत...