आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत भारतीयांकडून भारतीयांवरच हल्ले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ह्यूस्टन- अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात भारतीय वंशाच्या नागरिकांच्या घरावर चोरांनी हल्ला केल्याचा संशय व्यक्त होत आहे. एका भारतीय वंशाच्या नागरिकाच्या घरातील चोरीनंतर पोलिसांनी गुन्ह्याच्या पद्धतीवर संशय घेतला आहे. चाेरांची टोळी भारतीय वंशाच्या नागरिकांनाच निशाणा करत असल्याचे सांगण्यात येते.

टेक्सासमधील प्लानो शहरात १७ जुलै रोजी दोन जण एका भारतीयाच्या घरी पाठीमागच्या दरवाजातून घुसले होते. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही तमा बाळगली नाही. हे काम घुसखोरी करणाऱ्या टाेळीचे असल्याचा पोलिसांना संशय आहे. प्लानोचे पोलिस प्रवक्ते डेव्हिड टिले म्हणाले, यामध्ये आशियाई किंवा भारतीय घुसखोर असू शकतात. त्याअाधी डिसेंबरमध्ये कार चोरी आणि घुसखोरीच्या आरोपाखाली अनेक जणांना अटक करण्यात आली होती. त्यात बहुतांश आशियाई आणि भारवंशीय नागरिक होते.
बातम्या आणखी आहेत...