आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Black Money: टॅक्स हॅवन देशांमध्ये भारतीयांचे 11 लाख कोटी, इटलीचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- टॅक्स हॅवन देशांमध्ये जगभरातील सहा ते सात लाख ट्रिलियन डॉलर ब्लॅक मनी असल्याचा दावा बॅंक ऑफ इटलीने केला आहे. यात भारतीयांचे 152-181 लाख डॉलर अर्थात 9 ते 11 लाख कोटी रुपये ब्लॅक मनी असल्याचे बॅंक अॉफ इटलीने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. ब्लॅक मनी शेअर्स, कर्ज किंवा बॅंक डिपॉजिट्सच्या रुपात टॅक्स हॅवन देशामधील बॅंकांमध्ये जमा आहे.

तीन ग्रुप्सनी सांगितली वेगवेगळी आकडेवारी...
- बँक ऑफ इटलीच्या अहवालानुसार, रियल इस्टेट व गोल्डशिवाय दुसर्‍या मार्गाने ब्लॅक मनी इन्व्हेस्ट करण्‍यात येत आहे. याबाबत मात्र माहिती मिळालेली नाही.
- अर्थशास्त्रज्ज्ञ पेलेग्रिनी, सेनेली व तोस्ती या तिघांनी हा अहवाल तयार केला आहे.
- या आधी लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्सचे गॅब्रियल झुकमनने जागतिक पातळीवरील ब्लॅक मनीची आकडेवारी 7.6 ट्रिलियन डॉलर सांगितली होती.
- दुसरीकडे, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपने 8.9 ट्रिलियन डॉलर व टॅक्स जस्टिस नेटवर्कने ही आकडेवारी 21 ट्रिलियन डॉलर सांगितली होती.

कमकुवत कायदा व गोपनियतेची हमी हेच मुख्य कारण...
- बॅंक अॉफ इटलीचा हा अहवाल आयएमफ व बॅंक ऑफ इंटरनॅशनल सॅटलमेंट्सच्या दिलेल्या आकडेवारीवर आधारित आहे.
- एका इंग्रजी वृत्तपत्राने भारतीयांच्या ब्लॅक मनीसंदर्भात बॅंक ऑफ इटलीकडे माहिती मागितली असता तिने माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला.
- 2013 मध्ये जगाचा जीडीपीमध्ये भारताचा शेअर 2.5% होता. टॅक्स हॅवन देशांमध्ये इतकाच ब्लॅक मनी उपलब्ध असल्याचे रिपोर्ट तयार करणार्‍या पॅनलने म्हटले आहे.
- आजच्या तारखेत ही रक्कम 9 ते 11 लाख कोटींवर पोहोचली आहे.

ब्लॅकमनीबाबत आणखी दावे...
- डिसेंबर 2015 मध्ये आलेल्या एका रिपोर्टनुसार, भारतातील ब्लॅकमनी देशाबाहेर आला नसता तर 1970 पासून भारताच्या अर्थव्यवस्थेत 5% गतीने वाढ झाली असती.
- सरकारला अपेक्षा आहे की विविध योजनांच्या माध्यमातून लोक आपला ब्लॅकमनीचा खुलासा करतील. यातून जवळपास 15000 कोटी रुपये परत येईल.
- सप्टेंबरमध्ये 2015 पर्यंत केवळ 638 लोकांनी 3770 कोटी रुपयांचा ब्लॅकमनी जाहीर केला होता.
- दुसरीकडे स्विस बँकेने 2014 मध्ये सांगितले होते की त्यांच्या बॅंकेत असलेले 14100 कोटी रुपये भारतीयांचे आहेत.
- ग्लोबल फायनान्शियल इंटेग्रिटी या संस्थेने सांगितले की, भारतातून 2003 ते 2012 या काळात वर्षाला जवळपास 44 अब्ज रुपये विदेशातील बॅंकांमध्ये जमा केले जातात.

टॅक्स हॅवन कंट्रीजमध्ये ट्रान्सपरन्ट सिस्टीम नाही...
- टॅक्स वाचवण्यासाठी ट्रान्सपरन्ट सिस्टीम नसलेल्या देशांपैकी टॅक्स हॅवन कंट्रीज एक आहे.
- भारतीयांचा ब्लॅक मनी असलेल्या टॅक्स हॅवन देशांमध्ये कायदा कमकुवत आहे. तसेच अकाउंट्स गोपनियतेची हमी देखील दिली जाते.
- इतकेच नव्हे तर ब्लॅक मनी होल्डर्सची खरी ओळख देखील लपवली जाते.
बातम्या आणखी आहेत...