आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indias Firs Spy Founder Of Raw Rameshwar Nath Kao

भारताचा सर्वोत्कृष्‍ट गुप्तहेर, पाकिस्तान तोडण्‍यात होती महत्त्वाची भूमिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मार्च महिन्यात पाकिस्तानने बलुचिस्तानमधून भारतीय गुप्तचर संस्था रॉच्या एका गुप्तहेराला अटक केल्याचा दावा केला होता. कुलभूषण जाधव नावाचा हा गुप्तचर पूर्वी भारतीय नौदलात नोकरी करत असल्याचा दावा या देशाने केला आहे. रॉ म्हणजे रिसर्च अँड अॅनालिसिस विंग' ची सुरुवात आर.एन.कान यांनी केली होती. काव यांनीच त्यावेळी इस्रायल गुप्तचर संस्था मोसादशी छुपे संपर्क प्रस्थापित केले होते. या वेळी भारत-इस्रायलचे संबंध बिघडलेले होते. चीन आणि पाकिस्तानशी युध्‍दानंतर रॉची आवश्‍यकता वाटली...
- 1962 साली चीनशी आणि 1965 मध्‍ये पाकिस्तानशी युध्‍द झाल्यानंतर भारताला विदेशी गुप्तचर संस्थेची आवश्‍यकता भासू लागली.
- तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी इंटेलिजन्स ब्युरो व्यतिरिक्त 1968 मध्‍ये दुसरी विंग सुरु केली. त्यास रिसर्च अँड अॅनालिसिस विंग म्हणजे रॉ म्हटले जाऊ लागले.
- रामेश्‍वर राव काव हे तिचे पहिले प्रमुख होते. ते 1977 पर्यंत रॉचे प्रमुख राहिले.
- काव हे भारत सरकारच्या कॅबिनेट सचिवालयात सचिवही (संशोधन) होते.
- ते जवाहरलाल नेहरुंचे व्यक्तिगत सुरक्षा प्रमुख आणि राजीव गांधी यांचे सुरक्षा सल्लागार होते.
- काव यांची वैयक्तिक आयुष्‍यात ते खूपच गुप्तता पाळत. निवृत्तीनंतर ते कधीच सार्वजनिक ठिकाणी दिसले नाही. त्यांची केवळ दोन छायाचित्रे आहेत.
- 1982 मध्‍ये फ्रेन्च एक्सटर्नल इंटेलिजन्स एजन्सी एसडीईसीईचे प्रमुख अलेक्झांडर दे मेरेन्चेस यांनी काव यांची गणना 70 च्या दशकातील पाच टॉप इंटेलिजन्स अधिका-यांमध्‍ये केली होती.
पुढील स्लाइड्स जाणून घ्‍या, काव यांच्याविषयी आणखी रंजक बाबी...