आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत प्रमुख सुरक्षा भागीदार, अमेरिकेच्या संसदेकडून प्रस्तावाला हिरवा कंदील, करार होणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - भारत-अमेरिका आता संरक्षण क्षेत्रातील भागीदार झाले आहेत. अमेरिकेच्या संसदेने त्यास हिरवा झेंडा दाखवला आहे. २०१७ साठी ६ हजार १८० कोटी डॉलरच्या संरक्षणविषयक अर्थसंकल्पाला मंजुरी देताना सिनेटमध्ये या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाले.

२०१७ च्या नॅशनल डिफेन्स ऑथरायझेशन अॅक्टला पारित करताना सिनेटने भारताला प्रमुख संरक्षण भागीदार करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. हा प्रस्ताव सिनेटमध्ये ७ च्या बदल्यात ९२ मतांनी मंजूर झाला. त्यामुळे भारतासोबत द्विपक्षीय संरक्षण करार केले जाऊ शकतात. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने हा प्रस्ताव ३७५-३४ असा मंजूर केला होता. आता हा प्रस्ताव राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात येणार आहे.

युद्धासारखी परिस्थिती बनवल्याचा भारतावर आरोप : इस्लामाबाद- पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतावर दक्षिण आशियात अशांतता निर्माण करत असल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेच्या संसदेतील परदेश संबंध समितीच्या अध्यक्षांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे परराष्ट्र संबंध सल्लागार सय्यद तारिक फातमी हा मुद्दा उपस्थित केला. समितीचे अध्यक्ष व सिनेटर बॉब कॉरकर व सिनेटर बेन कार्डिन यांनी वॉशिंग्टनमध्ये भेट घेतली. भारताने काश्मीरमध्ये सातत्याने मानवी हक्क मूल्यांचे उल्लंघन केले आहे, असेही ते म्हणाले.

अटींवर मदतीचे आश्वासन
पाकिस्तानला आर्थिक मदत हवी असल्यास काही अटींची पूर्तता करावी लागेल, असे अमेरिकेच्या संसदेने स्पष्ट केले आहे. ९० कोटींच्या प्रस्तावापैकी ४० कोटी डॉलर पाकला देण्यासाठी ही अट घालण्यात आली आहे. हक्कानी नेटवर्कच्या विरोधात ठोस कारवाई केली जात आहे, याचे पाकिस्तानने पुरावे द्यावेत, असे अमेरिकेने म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...