आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या एनएसजी सदस्यत्वाचा मुद्दाच अजेंड्यावर नाही : चीन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - अणु पुरवठादार गटामध्ये (एनएसजी)नवीन देशांचा समावेश करण्यावरून सदस्य राष्ट्रांतच मतभेद असून भारताच्या सदस्यत्वाचा मुद्दा सेऊल बैठकीच्या अजेंड्यावरच नाही, असे स्पष्टीकरण चीनने दिले आहे. भारताला एनएसजीचे सदस्यत्व देण्यास चीनचा विरोध नसल्याचा दावा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केल्यानंतर चीनने हा बॉम्बगोळा टाकला आहे.

एनएसजीची पाच दिवसीय वार्षिक बैठक दक्षिण कोरियाच्या सेऊलमध्ये सुरू झाली. काही देश एनएसजीमधील प्रवेशावरून चिंतित आहेत. मात्र अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर (एनपीटी) न केलेल्या देशांच्या सदस्यत्वाचा मुद्दा अशा बैठकीचा विषय कधीच मुद्दा राहिलेला नाही. यावेळीही नाही. एनएसजीमध्येच त्यावर मतभेद आहेत, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी म्हटले आहे. एनएसजीच्या सदस्यत्वासाठी एनपीटी हा मूलाधार आहे. भारताला एनपीटीवर स्वाक्षरी न करताच एनएसजीमध्ये प्रवेश मिळत असेल तर अशा अन्य देशांनाही मिळाला पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

भारतीय अधिकाऱ्यांनी म्हटले की, आम्ही अजूनही आशावादी आहोत. मीडियातील बातम्यांवर लक्ष देऊ नका. आमच्या सदस्यत्वावर चर्चा होण्याची शक्यता आहे. ४८ देशांच्या या गटात आम्हाला बहुतांश देशांचा पाठिंबा आहे.

ताश्कंदमध्ये जिनपिंग यांना भेटणार मोदी
२४ जूनला एनएसजीची मुख्य बैठक होणार आहे. त्याच्या एक दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची ताश्कंदमध्ये भेट घेऊ शकतात. दोन्ही नेत्यांत एनएसजीच्या मुद्यावर चर्चा करू शकतात, असे मानले जाते. ताश्कंदमध्ये शांघाय सहकार्य संघटनेची बैठक आहे.
बातम्या आणखी आहेत...