आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Indian Army ने लाहोरमध्‍ये फडकवला होता तिरंगा, पाकिस्तानने खाल्ली होती माती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानी लष्कराने प्रशिक्षण दिलेल्या दहशतवाद्यांनी उरीमधील भारतीय लष्करी छावणीवर हल्ला करुन 18 जवानांना ठार मारले. याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकिस्तानी भूमिवर असलेली दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे नष्ट करण्याची मागणी होत आहे. काल रात्रीच्या सुमारास भारतीय लष्कराच्या कमांडोंनी अशी कारवाई राबविल्याचे सांगितले जात आहे. त्यात 20 दहशतवादी ठार झाले तर शेकडो जखमी झाल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमिवर आम्ही घेऊन आलोय 1965 च्या युद्धातील काही अविस्मरणीय स्मृती... तुमची मान अभिमानाने ताठ होईल... भारतीय लष्कराची क्षमता सिद्ध होईल....
1965 च्या भारत-पाकिस्तान युध्‍दात भारतीय नौदलाने महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. सात सप्टेंबर 1965 रोजी कमांडार एस. एम.अनवर यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी नौदलाने द्वारका येथील नौदलाच्या रडार केंद्रावर बॉम्ब वर्षाव केला. रडार स्टेशनवर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा संसदेतही गाजला आणि यामुळे संरक्षण अर्थसंकल्पात 35 कोटी रुपयांपासून वाढून 115 कोटी रुपये करण्‍यात आला. पाकिस्तानी सूत्रांनुसार पाकिस्तानी नौदलाच्या एका पाणबुडी पीएनएस गाझीने भारतीय नौदलाचे विमान वाहतूक जहाज आयएनएस विक्रांतला पूर्ण युध्‍दात मुंबईत घेरुन ठेवले होते. भारतीय सूत्रांनी दावा केला होता, की भारत पाकिस्तानसोबत नौदलाच्या आघाडीवर युध्‍द करु इच्छित नाही आणि ते जमिनी युध्‍दापर्यंत सीमित करु इच्छित होता.
वास्तविक पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय हवाईतळात घुसखोरी केली होती. पाकने भारताचे तळ उद्ध्‍वस्त करण्‍यासाठी अनेक गुप्त मोहिमा चालवल्या. जाणून घ्‍या, 1965च्या युध्‍दात पाकिस्तान भारताच्या हवाईतळावर कशी घुसखोरी केली व काय होते नियोजन...

- चीफ ऑफ पाक आर्मी स्टाफ जनरल मोहम्मद मूसानुसार, सात सप्टेंबर 1965 रोजी विशेष सर्व्हिसेस ग्रुपच्या कमांडो पॅराशूटच्या माध्‍यमातून भारतीय भागात घुसखोरी केली.
- जवळजवळ 135 कमांडो भारताच्या तीन हवाईतळावर(हलवारा, पठाणकोट आणि आदमपूर) उतरले. मात्र पा‍क सैन्याला या चुकीची भारी किंमत मोजावी लागली होती.
- पाकिस्तानचे फक्त 22 कमांडो आपल्या देशात परतू शकले. 93 पाकिस्तान सैनिकांना पकडण्‍यात आले. यात एक ऑपरेशनचे कमांडर मेजर खालिद बट्टही सामील होते.
- पाकिस्तानी सैन्याच्या अपयशामागे त्यांची अपुरी तयारी सांगितले जाते.

भारताने असे दिले प्रत्युत्तर
- इतके मोठे अपयश मिळवूनही पाकच्या कमांडो मिशनमुळे भारतीय सैन्याचे काही ऑपरेशन प्रभावित झाले.
- भारतीय सैन्याच्या 14 व्या इन्फँट्री डिव्हिजनच्या पॅराट्रुपर्सला पकडण्‍यासाठी पांगवण्‍यात आले. पाकच्या हवाई दलाने भारतीय लष्‍कराचे अनेक वाहनांना लक्ष्‍य केले.
- या दरम्यान पाकिस्तानमध्‍ये ही बातमी हवेप्रमाणे पसरली, की भारताने पाकिस्तानच्या गुप्त ऑपरेशनला तसेच प्रत्युत्तर दिले आहे व पाकिस्तानी जमिनीवर कमांडो पाठवले आहेत.

पत्राचा बॉम्ब :
- सात सप्टेंबर रोजी चीनमध्‍ये पाकिस्तानचे राजदूतने चीनच्या तत्कालीन राष्‍ट्रपती लिऊ शाओकींची भेट घेतली व अयूब खानला पत्र दाखवत त्यांच्याकडे चीनकडून मदत मागितली.
- लगेच दुस-या दिवशी भारतावर 'पत्र बॉम्ब'चा वर्षाव झाला. अक्साई चीन व सिक्कीममधील नियंत्रण रेषेवर सैन्य पाठवल्याचे चीनने भारतावर आरोप लावला.
- 1962 च्या युध्‍दानंतर प्रथमच असे कथित घुसखोरी काश्‍मीरच्या परिस्थितीशी जोडले गेले.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्‍या, या युध्‍दाची सुरुवातीपासून ताश्‍कंद करारापर्यंतची कहाणी...
बातम्या आणखी आहेत...