आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडोनेशियातील रेल्वे प्रकल्पात चीनची बाजी, जपानचा प्रस्ताव फेटाळण्यात आला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो- इंडोनेशियातील मोठ्या रेल्वे प्रकल्प उभ्या करण्याच्या निविदा करारात चीनने बाजी मारली असून यात प्रमुख दावेदार मानल्या जाणारया जपानचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे.
इंडोनेशियाचा निर्णय अत्यंत खेदजनक असल्याची प्रतिक्रिया जपानने दिली आहे.
इंडोनेशियातील नवीन रेल्वे प्रकल्पांसाठी चीन आणि जपानमध्ये स्पर्धा होती. आशियात दोन मोठ्या अर्थव्यवस्था असलेले हे देश या खंडात आपला प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. इंडोनेशियाने सुरुवातीस जकार्ता ते बांगडुंगदरम्यान हायस्पीड रेल्वेमार्ग बांधण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, त्याऐवजी या महिन्यात याच मार्गावरून स्वस्तातील कमी वेगवान रेल्वेसेवा उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर दोन्ही देशांनी नवीन प्रस्ताव दाखल केले.

इंडोनेशियाच्या अंतर्गत वाहतुकीसोबतच अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या दृष्टीने हे मार्ग अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. म्हणूनच जपान-चीन यांच्यात यासाठी स्पर्धा होती.