पोर्ट मोरेस्बी - पपुआ न्यू गिनी जवळ आज (रविवार) दुपारी इंडोनेशियाचे एक विमान गायब झाले होते. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास ओक्सिबिल जिल्ह्यातील एका गावातील डोंगराजवळ या विमानाचे अवशेष सापडले असून, या दुर्घटनेत 54 जण ठार झाले आहेत. मृतामध्ये पाच बालकांचा समावेश आहे. ओक्सिबिल जिल्ह्यातील ग्रामस्थांनी हा अपघात पाहिल्याचे वृत्त स्थानिक वर्तमानपत्रांनी दिले.
इंडोनेशियाच्या डोमेस्टिक पॅसेंजर एयरक्राफ्टच्या ट्रिगाना एयर सर्व्हिस हे विमान आहे. त्याचा मॉडल क्रमांक एटीआर 42 आहे. यामध्ये 49 प्रवाशांसह पाच क्रू मेंबर होते. नॅशनल सर्च अॅड रेस्क्यू एजेंसीने सांगितले, रविवारी दुपारी या विमानाचा संपर्क तुटला. त्यावेळी हे विमान पपुआ प्रांतांची राजधानी जयापुराच्या सेंटानी वरून उडत होते.
गतवर्षी झाला होता 162 प्रवाशांचा मृत्यू
डिसेंबर 2014 मध्ये एयर एशियाचे पॅसेंजर प्लेन इंडोनेशियाच्या सुराबाया से सिंगापूर दरम्यान क्रॅश झाले होते. यात विमानातील सर्व 162 प्रवाशी ठार झाले होते. या शिवाय एकाच महिन्यापूर्वी इंडोनेशियाचे एक मिलिट्री ट्रांसपोर्ट प्लेन उत्तरेकडे क्रॅश झाले होते. यात 100 व्यक्तींचा मृत्यू झाला होता.