आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडोनेशियात धगधगत्या लाव्हाचे पाट पायथ्याशी, 10 हजार लोक विस्थापित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलर्टसिनाबंग - इंडोनेशियातील सिनाबंग पर्वतरांगातून गुरूवारी धगधगत्या लाव्हाचा रस वाहू लागला. लाव्हाचे पाट वाहून पायथ्याशी येत असल्याने परिसरातील नागरिकांना प्रशासनाकडून अगोदरच दक्षतेचा इशारा देण्यात आला होता. जूनपासून लाव्हा उफाळत असल्याने ज्वालामुखाचा आकार वाढत गेला. त्यानंतर लाव्हाचे प्रवाह वाहू लागले. ज्वालामुखी जवळ असलेल्या कारो जिल्ह्यातील सुकानुला गावात धुळीचे राळ दिसत होते. सुरक्षेच्या कारणास्तव 10 हजार लोकांना गावातून विस्थापित करण्‍यात आली आहे.
पुढे पाहा जागृत ज्वालामुखीचे छायाचित्रे...