आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे ISIS ची पहिली महिला दहशतवादी, आता जगतेय अशी LifeStyle

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दहशतवादी होण्यापूर्वीचा तानियाचा फोटो - Divya Marathi
दहशतवादी होण्यापूर्वीचा तानियाचा फोटो
इंटरनॅशनल डेस्क - पहिली महिला दहशतवादी तानिया ज्यार्गेलास आता अमेरिकेच्या डलास शहरात आपल्या सासू-सासऱ्यांसोबत एक सर्वसामान्य आयुष्य जगतेय. नुकतेच एका ऑनलाईन नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत तानियाने पतीसोबत इसिसमध्ये सहभागी झाल्यापासून ते अमेरिकेत परतल्यापर्यंतची स्टोरी सांगितली. असे मानले जाते की, तानिया आणि तिचा पती जॉन इसिसमध्ये सहभागी होणारे पहिले अमेरिकन-ब्रिटन नागरिकांपैकी पहिले होते. मुलांनाही बनवायचे होते खतरनाक दहशतवादी...
 
- 33 वर्षाची तानिया ब्रिटिश-बांग्लादेशी नागरिक नुरज आणि जहानारा चौधरी यांच्या पाच मुलांपैकी एक आहे.
- तानियाने मुलाखतीत सांगितले की, खूप कमी वयात वंशवादाचे शिकार व्हावे लागले होते. त्यामुळे मनामध्ये राग कायम असायचा.
- तानियाने सांगितले की, 11 सप्टेंबर 2001मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शाळेमध्ये मुलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे दुसऱ्या धर्माबद्दल राग अधिक वाढला.
- काही वर्षानंतर अमेरिकेने केलेल्या इराक हल्ल्याचा विरोध केल्याबद्दल एका गर्दीत एक चिठ्ठी देण्यात आली. या चिठ्ठीत मुस्लिम डेटिंग वेबसाईटचा पत्ता देण्यात आला होता.
- या वेबसाईटवरून जॉन ज्योर्गेलास नामक एका व्यक्तीला भेटली. डलासमध्ये राहणारा जॉन कन्वर्टेड मुस्लिम होता.
- तानियाने सांगितले की, जॉन नेहमी जिहाद आणि दहशतवादाच्या चर्चा करीत. त्यांना एकमेकांच्या गप्पा आवडायला लागल्या. कालांतराने ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
- 2004 साली तानिया आणि जॉनने इंग्लंडच्या गोथिक टाऊनमध्ये लग्न केले. लग्नावेळी तानिया तीन मुलांसह पुन्हा एकदा प्रेग्नंट होती.
- 2013 मध्ये जॉनसोबत सीरीयात पळण्यापूर्वी तानिया आई होणार होती. तरीसुद्धा जॉन आणि तानिया आपल्या तिन्ही मुलांसह इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी सीरीयाला निघाले.
- तानियाने सांगितले की, मला माझ्या मुलांनाही खतरनाक दहशतवादी बनवायचे होते. त्यासाठी सीरीयाला पळून गेली होती.
- सीरीयामध्ये तानिया आणि तिच्या मुलांना ज्याठिकाणी ठेवण्यात आले होते. त्याठिकाणी खिडकीही नव्हती, तसेच स्वच्छ पाणीही नव्हते.
- अशा ठिकाणी ठेवण्यात आल्याने तानिया आणि तिच्या मुलांची तब्येत झपाट्याने खराब होऊ लागले होते. त्यामुळे तिने घरी परतण्याची मागणी जॉनकडे केली.
- इसिसपासून पळून जाणाऱ्यांना भयंकर शिक्षा दिली जाते. मात्र जॉनने तानियासह मुलांना कोणतीही शिक्षा न देता घरी परतण्याची परवानगी दिली.
- जॉनच्या कुटूंबियाच्या मदतीने तानिया मुलांसह अमेरिकेत परतली. मात्र जॉनचा आतापर्यंत काहीही ठावठिकाणी मिळालेला नाही. जॉन आता सीरीयात इसिसचा कमांडर झाल्याचे मानले जात आहे.
सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे आयुष्य जगतेय तानिया
- तानियाने मुलाखतीत सांगितले की, काही दिवसांपूर्वी तिने पुन्हा एकदा ऑनलाईन डेटिंग सुरु केली. आपल्या प्रोफाईलमध्ये चार मुलांची आई असल्याच्या डिटेल्सही शेअर केल्या.
- डेटिंग वेबसाईटवरून तिची मुलाखत मिनेसोटा येथे राहणाऱ्या क्रेगसोबत झाली. क्रेग एक आयटी प्रोफेशनल आहे.
- क्रेगच्या मते, तानिया त्यांना पहिल्याच भेटी आवडू लागली. त्यानंतर दोघांनीही सोबत राहण्याचा निर्णय घेतला. क्रेग आणि तानिया मागील कित्येक वर्षापासून सोबत राहत आहे. चर्चमध्ये तिच्यासारख्या भरकटलेल्या लोकांना चांगले आयुष्य जगण्यासाठी एक प्रोग्राम सुरु करण्याची इच्छा तानियाची आहे.
बातम्या आणखी आहेत...