आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO : न्यूयॉर्कमध्ये ढोल ताशाच्या गजरात गणपती बाप्पाचे आगमन....

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महाराष्ट्राचा गणेशोत्सव जगाच्या पाठीवर प्रसिद्ध आहे. मुंबई-पुण्यातील गणेशोत्सव अनुभवण्यासाठी भारतातूनच नव्हे, तर जगभरातून लोक येतात. गणपती बाप्पाच्या आगमनाची जितकी आतुरता महाराष्ट्रात असते, तितकीच आतुरता परदेशी स्थायिक झालेल्या मराठी बांधवातही असते. न्यूयॉर्कमधील ऑल्बानी हिंदू मंदिरात अगदी ढोल ताशाच्या गजरात गणपती बाप्पाचे गुरुवारी आगमन झाले. गणपती बाप्पाच्या आगमनावेळी केवळ मराठीच नव्हे तर परदेशी लोकांनीही हिरारीने सहभाग घेतला होता. 
 
'दिव्य मराठी वेब टीम'शी बोलतांना न्यूयॉर्कमधील कल्याण घुले म्हणाले, की गणपती म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. दरवर्षी उत्साहाने जगण्यासाठी लागणारी ऊर्जा या दहा दिवसांत गणपती बाप्पाकडून मिळते. यावर्षी मराठी बांधवांनी एकत्र येऊन ढोल ताशाच्या गजरात मिरवणुकीसह गणपती बाप्पांचे स्वागत केले. अगदी महाराष्ट्रात जसे गणरायाचे स्वागत होते, अगदी तसेच वातावरण न्यूयॉर्कमध्ये तयार झाले होते. मराठी बांधवांसह अनिवासी भारतीय आणि अमेरिकन नागरिकांनीही गणरायाचे दर्शन घेतले. या मिरवणुकीत ढोलवादक, ताशावादन, झांजवादन, टोल वादन, ध्वज नमस्ते आणि लेझीमचे सादरीकरण झाले. मिरवणुकीत महिला नववारी साड्यांत सहभागी झाल्या होत्या. तर पुरुष जिन्स, पांढरा कुर्ता आणि मोदी जॅकेट या वेशभूषेत सहभागी झाले होते. यासाठी जय भारत ढोल ताशा पथकासह शिल्पा घुले, डॉ. मनिषा माधवी आणि वसंत माधवी यांच्यासह अनेकांनी पुढाकार घेतला होता. 
 
पुढील स्लाईडवर पाहा - गणपती बाप्पाच्या आगमनाच्या मिरवणुकीचे खास फोटो
 
बातम्या आणखी आहेत...