आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कबरींवर पाय ठेवून तरुणींनी केले फोटोशूट, FB वर शेअर झाल्यावर उडाला गोंधळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्देनास - सध्या मेक्सिकोमध्ये एक फोटोशूट चांगलेच चर्चेत आहे. यामध्ये तीन तरुणींनी कबरींवर पाय ठेवून वेगवेगळ्या पोजमध्ये फोटोशूट केले आहे. फेसबुकवर हे फोटो शेअर झाल्यानंतर कार्देनास येथील एका तरुणीने यावर आक्षेप घेतला. तरुणीने दावा केला आहे की ही कबर तिच्या आजोबाची असून याबाबत संबंधित प्रशासनाकडे तक्रारही केली आहे. दुसरीकडे फेसबुकर शेअर केलेल्या या फोटोशूटवर नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. 4 लाख फॉलोअर्ससोबत शेअर केला फोटो...
 
- कार्देनास येथील रहिवासी एन्सी हर्नान्देज या तरुणीने या फोटोशूटवर चांगलाच आक्षेप घेतला आहे. तिने या फोटोशूटबद्दल तक्रारही दाखल केली आहे. 
- एन्सी म्हणाली की, त्या तरुणी स्वत:ला काय समजतात. ज्यांनी माझ्या आजोबांच्या कबरीवर पाय ठेवून फोटो काढले.
- या तरुणींना कदाचित त्यांच्या पालकांनी इतरांचा सन्मान करण्याचे शिकवले नसावे. 
- हे फोटो एग्सो ऑर्टेाने फेसबुकवर पोस्ट केले आहे. तिचे तब्बल 4 लाख फॉलोअर्स आहेत.
- त्यानंतर हा फोटो 20 हजार जणांनी शेअर केला आहे. त्याशिवाय हजारो प्रतिक्रिया आलेल्या आहेत. हे फोटोशूट अपमान असल्याचे त्यांनी सांगितले.
- नॅन्सी बेलो नामक एका युजर्सने सांगितले की, हे फोटोशूट म्हणजे अत्यंत खालच्या दर्जाची क्रिया आहे. कदाचित दुसऱ्यांना आकर्षित करण्यासाठी हे फोटोशूट करण्यात आले आहे. 
- या प्रकरणाबाबत सिटी ऑथरिटीतर्फे कोणत्याही प्रकारचा खुलासा आलेला नाही. या तरुणींची ओळखही अद्याप समोर आलेली नाही.
 
पुढील स्लाईडवर पाहा - कबरींवर पाय ठेवून केलेले फोटोशूट
बातम्या आणखी आहेत...