Home »International »Other Country» India Supports Rules-Based Security Architecture

दहशतवादाशी लढण्यास सर्वांनी एकत्र यावे : मोदी; पाच देशांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा

वृत्तसंस्था | Nov 15, 2017, 02:57 AM IST

मनिला-दहशतवादाशी लढण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. ही लढाई सोपी नाही, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसियान परिषदेच्या व्यासपीठावरून मंगळवारी केले. मोदी यांनी चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांच्यासह पाच देशांच्या पंतप्रधानांशी द्विपक्षीय चर्चा केली.
गेल्या काही दिवसांपासून भारत-चीन यांच्यातील तणावात वाढ झाली होती. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी चीनसोबतचा तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला.
उभय नेत्यांमधील बैठकीचा नेमका तपशील स्पष्ट होऊ शकला नाही. परंतु डोकलाम वादानंतरची ही बैठक दोन्ही देशांसाठी महत्त्वाची मानली जाते. उभय देशांत डोकलामचा वाद दोन महिने ताणला गेला होता. चीनने सीमेवर रस्त्याचे बांधकाम सुरू केल्यानंतर भूतानने त्याला आक्षेप घेतला होता. हा प्रदेश भूतानचा असल्याचा दावा चीनने मात्र फेटाळला होता. त्यावरून तणावाला सुरुवात झाली होती. मात्र, आता चीनने भूमिका बदलली आहे. चीन आसियान-चीन परिषदेच्या दहासदस्यीय राष्ट्रांसोबत बळकट संबंध कायम ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही ली परिषदेच्या व्यासपीठावरून दिली आहे. दरम्यान, आसियान संघटनेत १० सदस्य देश आहेत. त्या व्यतिरिक्त भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका, रशिया यांचाही समावेश होतो. मोदी यांनी आसियान देशांसोबतच्या संबंधाला बळकटी आणतानाच जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ब्रुनेई, व्हिएतनाम या देशांना भारतात गुंतवणुकीचे आवाहन केले.
ऑस्ट्रेलिया, जपान, व्हिएतनामसोबत चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसियान परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल, जपानचे शिंजो अॅबे, व्हिएतनामचे न्यूगेन शूनफूक, ब्रुनेईचे हसनल बोल्किहा, न्यूझीलंडचे जॅसिंडा अर्डर्न यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. बैठकीत विविध क्षेत्रांत सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला आहे.
चीनबाबत काय म्हणाले मोदी?
- ASEAN मध्ये भाषणादरम्यान मोदींनी थेट चीनचे नाव घेतले नाही. पण रिच इंडो पॅसिफिक रीजनमध्ये रूल बेस्ड सिक्युरिटी आर्किटेक्चर असायला हवे, असे ते म्हणाले.
- भारत ASEAN ला विश्वास देऊ इच्छितो की, अशा रूल बेस्ड सिक्युरिटी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सहकार्य कायम ठेवू. या भागाचे हित आणि शांततापूर्ण विकासासाठी कायम प्रयत्न असेल.
मोदी जंटलमॅन आणि आमचे मित्र, ते चांगले काम करताहेत : ट्रम्प
- मोदी म्हणजे अत्यंत चांगले काम करत असलेले आमचे मित्र आहेत, असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांनी मोदींना जंटलमॅनही म्हटले. ते म्हणाले, पंतप्रधान माझ्याबरोबर आहेत. यापूर्वी आम्ही व्हाइट हाऊसमध्येही भेटलो आहोत. ते आता आमचे चांगले मित्र बनले आहेत. अनेक प्रकरणांवर आम्ही तोडगा काढला आहे. भविष्यातही आम्ही तसे करत राहू. चार महिन्यांत या दोघांची ही दुसरी भेट होती.
- मोदी आणि ट्रम्प यांच्या सुरक्षेच्या मुद्द्याशिवाय इतरही काही महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली होती.

Next Article

Recommended