आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इसिसचा म्होरक्या नाटो कारवाईत ठार; पाकच्या प्रामाणिकतेवर अफगाण राजदूताचे प्रश्नचिन्ह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद/काबूल- इस्लामिक स्टेट ऑफ सिरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेचा अफगाणिस्तानातील म्होरक्या अब्दुल हासिब अमेरिकन लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये मारला गेल्याची महिती सोमवारी काबुलमधील अधिकृत सूत्रांनी दिली. हासिब हा अफगाणिस्तानातील अनेक बड्या दहशतवादी हल्ल्यांचा प्रमुख सूत्रधार होता. त्याने एका रुग्णालयावर हल्ला केला होता. त्यात ५० पेक्षा अधिक निरपराधांचे बळी गेले. 

राष्ट्राध्यक्ष कार्यालयातून ही माहिती देताना अफगाणिस्तान दहशतवाद विरोधी मोहिमेत पारदर्शक असल्याचा दावाही करण्यात आला. हासिब पूर्वेच्या नंगरहार येथे विशेष सैन्य तुकडीने केलेल्या कारवाईत मारला गेला. 

अफगाणिस्तानातील नाटो कमांडर जनरल जाॅन निकल्सन यांनी सांगितले की, इसिसचा दहशतवादी देशात आला तर त्याला कंठस्नान घालू. पूर्वी अफगाणिस्तानात ३००० इसिस दशतवादी होते.आता ही संख्या ८०० वर आल्याचा दावा त्यांनी केला. अमेरिकेन सर्वात मोठा बॉम्ब हल्ला अफगाणिस्तानात केला होता.

चमन संघर्षात ५० अफगाण सैनिक ठार झाले नाहीत: आेमर 
पाकिस्तानच्या निमलष्करी दलाने ५० अफगाणी सैनिकांना ठार केल्याविषयी अहवाल सादर केला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या संघर्षात ५० अफगाण सैनिकांना ठार केल्याचा दावा सपशेल खोटा असून केवळ दोनच सैनिक शहीद झाल्याचे अफगाणिस्तानने म्हटले आहे. अफगाणिस्तानचे पाकमधील राजदूत आेमर झाखीवाल यांनी याविषयी खुलासा केला. यात ७ अफगाण सैनिक जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान पाकमधील सर्व आघाडीच्या माध्यमांनी शत्रूपक्षाच्या ५० सैनिकांना ठार तर १०० जखमी असल्याचे म्हटले आहे. चमन येथे झालेल्या संघर्षात दोन अफगाणी सैनिक ठार होणेही दुर्दैवी असल्याचे झाखीवाल म्हणाले. उभय देशांच्या संबंध दृढीकरणावर भर दिला जात असताना हे विपरित असल्याचे त्यांनी ट्विट केले.
बातम्या आणखी आहेत...