आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे क्षणाक्षणाला पोहोचताहेत शेकडो रोहिंग्या मुस्लिम, अशी निर्माण झाली भयानक स्थिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - म्यानमारच्या रखाईन प्रांतात मागील काही महिन्यांपासून हिंसचे सत्र सुरु आहे. या हिंसाचारामुळे लाखो रोहिंग्यांनी बांग्लादेशात शरण घेतली आहे. इंटरनॅशनल रेफ्युजी ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टनुसार, येथे प्रत्येक मिनीटाला शेकडो रोहिंग्या पोहोचताहेत. त्यामुळे रेफ्युजी कॅम्पची स्थिती दयनीय होत आहे. रेफ्युजी कॅम्पच्या चारही बाजूंनी चारा आणि पाण्याची दलदल आहे. नदीचे पाणी कमी झाल्यावर येथे दलदल निर्माण होते. त्यामुळे म्यानमार नदी पार करून कॅम्पला पोहोचणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. 
 
प्रत्येक पाचपैकी एक मुलगा कुपोषित...
- बांग्लादेश आणि म्यानपारच्या एका बॉर्डरवर शरणार्थी म्हणून तब्बल 6 लाख रोहिंग्या पोहोचलेले आहेत. त्यापैकी 58 टक्के मुलांची संख्या आहे.
- न्यूज एजन्सी एफेनुसार, लहान मुलांसाठी काम करणाऱ्या यूनायटेड नेशनची संस्था युनिसेफने म्हटले आहे की, या मुलांना संक्रमण आजार होण्याची शक्यता अधिक आहे.
- युनिसेफचे कार्यकारी अधिकारी एंटोनी लेकने सांगितले की, बांग्लादेशात असंख्य रोहिंग्या शरणार्थीवर म्यानमारमध्ये असा अत्याचार पाहिला आहे. जो लहान मुलांनी कधीही पाहिला नसेल.
- रिपोर्ट तयार करणाऱ्या सिमोन इनग्रामने सांगितले की, प्रत्येक पाचपैकी एक मुलगा वेगाने आजारी आणि कुपोषित होत आहे.
 
नदी पार करून हजारो लोकांचे गेले जीव
- म्यानमारमधून बांग्लादेशापर्यंत पोहोचण्यासाठी रोहिंग्यांना एक दलदलनुमा नदी पार करावी लागते.
- ही नदी पलटून आतापर्यंत हजारो पुरुष, वृद्ध आणि महिलांचा मृत्यू झाला आहे.
- मीडिया रिपोर्टनुसार, येथील आर्मी अधिकाऱ्यांनी रोहिंग्याच्या तब्बल 20 जहाज नेस्तनाबूत केले. अधिकाऱ्यांनी या शरणार्थींवर स्मगलर होण्याचा आरोप लावला आहे.
- बांग्लादेशतील कॉक्स बाजारात दोन शरणार्थी शिबीरांत 25 ऑगस्टपूर्वी 34 हजार रोहिंग्या मुस्लिम राहत होते. आता यांची संख्या 6 लाखावर पोहोचली आहे.
- यामुळे लोकांना राहण्यासाठी जमीन आणि छतांची कमतरता भासतेय. त्याशिवाय अन्नपाण्यावाचून रहावे लागतेय.
- याव्यतरिक्त वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे कॅम्पमध्ये आजारांना निमंत्रण दिले जातेय.
 
पुढील स्लाईडवर पाहा - रेफ्यूजी कॅम्पची दयनीय स्थिती PHOTOS
बातम्या आणखी आहेत...