आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅक्रोनकडे एकही संसद प्रतिनिधी नाही, मजबूत निर्णयांसाठी संसदीय निवडणुकीत यशाची गरज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस- फ्रान्समध्ये इमॅन्युएल मॅक्रोन यांनी इस्लामविरोधी आणि उजव्या विचारसरणीच्या नेत्या ली पेन यांना राष्ट्राध्यक्षपदापासून दूर सारले. ३९ वर्षीय मॅक्रोन यांनी कमी वयात त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण केल्या. ते केवळ ५ वर्षांपूर्वी राजकारणात आले आहेत. समाजवादी सरकारमध्ये अर्थमंत्रिपद सांभाळले. भ्रष्टाचार, बेरोजगारी, खालावलेली अर्थव्यवस्था ही कारणे देत  राजीनामा दिला. एक वर्षापूर्वी ‘आं मार्शे’ म्हणजे ‘पुढे चला’ (आगे बढो) 
चळवळ सुरू केली. आता राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. फ्रान्सच्या राजकारणातील ही सर्वात अल्पावधीत झालेली प्रगती आहे. १९५८ नंतर फ्रान्सच्या आधुनिक प्रजासत्ताकामध्ये प्रथमच ३९ वर्षीय व्यक्ती राष्ट्राध्यक्षपदी आली आहे.  

मॅक्रोन कॉन्सर्ट पियानो वादक  आणि बँकरही होते. त्यांच्याकडे आता यशाचा आनंद साजरा करण्यासाठी वेळ नाही. ११ आणि १८ जून रोजी संसदीय निवडणुका होणार आहेत. अधिक जागा जिंकल्यास ते आपल्या निर्णयांची अंमलबजावणी करू शकतील. त्यांना ‘आं मार्शे’ चळवळीला आता राजकीय पक्षात परिवर्तित करावे लागेल. 

संसदीय निवडणुकीत उमेदवार उभे करावे लागतील. या निवडणुकीत बहुमत मिळाले तरच त्यांना पसंतीच्या व्यक्तीला पंतप्रधानपद देता येईल. सध्या त्यांच्याकडे एकही संसद सदस्य नाही. १४ मेपासून मॅक्रोन राष्ट्राध्यक्षपदाची 
सूत्रे स्वीकारतील.  

फ्रान्सवर: मंदीचा बळी ठरलेल्या देशात दिसेल आर्थिक बदल
फ्रान्समध्ये बेरोजगारीचा दर १० टक्क्यांहून जास्त आहे. मॅक्रोन यांनी तंत्रज्ञान, ऊर्जा, रोजगार प्रशिक्षण इत्यादीसारख्या क्षेत्रात ५५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे. म्हणूनच मॅक्रोन आर्थिक फेर बदलासाठी अनेक मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. ते मोठे सैन्यदल असावे, या मताचेही आहेत.

ईयू: मॅक्रोन यांच्या विजयामुळे युरोपीय संघाचे विघटन टळले 
ब्रिटनने युरोपीय संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर फ्रान्स व जर्मनीच या संघटनेचे इंजिन आहे. मॅक्रोन ईयूचे समर्थक आहेत. ली पेन मात्र देशाने इयुमधून बाहेर पडावे, या मताच्या होत्या. फ्रान्सशिवाय युरोपीय संघाच्या अस्तित्वाला अर्थ उरला नसता. आता संकटाचे ढग निवळले आहेत.

जग: मग पुन्हा राष्ट्रवाद संरक्षणवादाचा जन्म 
नूतन राष्ट्राध्यक्षांच्या यशापयशाचा परिणाम युरोपच्या बाहेर देखील प्रभाव टाकणारा ठरू शकतो, एवढे निश्चित. मॅक्रोन यशस्वी झाल्यास राष्ट्रवादी व राजनैतिक कट्टरवादासारख्या शक्तींचा पराभव होईल. अपयशी ठरल्यास लोकानुनय, राष्ट्रवादाचा पुन्हा जन्म होईल. 

भारत: संरक्षण सौद्यांना वेग येईल, विद्यार्थ्यांसाठी दारे खुली राहतील 
भारत-फ्रान्सच्या संरक्षण सौद्यांत वेग येईल. मॅक्रोन युरोपीय संघाचे समर्थक नेते आहेत. ही बाब भारतासाठी पूरक ठरेल. अमेरिका व ऑस्ट्रेलियात व्हिसा नियमांत झालेल्या बदलामुळे भारतीय कामगार व विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. फ्रान्स मात्र भारताच्या कुशल कामगार व विद्यार्थ्यांसाठी खुला आहे. 
 
पुढील स्लाइडवर वाचा मॅक्रोन यांच्या विजयाची पाच मोठी कारणे...
बातम्या आणखी आहेत...