आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रिटनमध्येही पद्मावतीला विरोध, चित्रपट रिलीज केल्यास थिएटर जाळण्याची दिली धमकी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन/नवी दिल्ली - संजय लीला भंसाळी यांचा चित्रपट पद्मावतीचे ब्रिटनमधील रिलीजही पुढे ढकलले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याठिकाणी थिएटर मालकांना धमकी देण्यात आली आहे की, जर हा चित्रपट जर ब्रिटनमध्ये रिलीज करण्यात आला तर थिएटरमध्ये आग लावली जाईल. ब्रिटनमध्ये या चित्रपटाचे राइट्स पॅरामाऊंट पिक्चर्सकडे आहेत आणि आता ही कंपनी चित्रपट रिलीज करायचा की नाही, याचा विचार करत आहे. पद्मावती हा चित्रपट 1 डिसेंबरला रिलीज होणार होता पण काही संघटनांच्या विरोधामुळे त्याची भारतातील रिलीज डेट पुढे ढकलली आहे. 


ब्रिटनमध्ये काय झाले.. 
- ब्रिटनमध्ये चित्रपटाच्या रिलीज साठी 'ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन' (BBFC) सर्टिफिकेट देते. पद्मावतीच्या रिलीजसाठीही हे सर्टिफिकेट जारी करण्यात आले आहे. शेड्यूलनुसार ब्रिटनमध्ये हा चित्रपट 1 डिसेंबरला रिलीज केला जाणार आहे. 
- ब्रिटनमध्ये राजपुतांची संघटना 'राजपूत समाज ऑफ युके' ने सुरुवातीपासूनच या चित्रपटाचा सर्टिफिकेट देण्याचा विरोध केला आहे. संघटनेने म्हटले की, त्यांना शांततापूर्ण मार्गाने याचा विरोध करायचा आहे. 
- चित्रपटात ऐतिहासिक तथ्ये चुकीच्या पद्धतीने मांडली असल्याचे म्हटले आहे. चित्रपट आधी इतिहासकारांना दाखवला जावा म्हणजे त्यात कोणाचे चुकीचे चित्रण होणार नाही, असेही संघटनेने म्हटले आहे. 
- संघटनेचे प्रवक्ते म्हणाले की, चित्रपट ब्रिटनमध्ये रिलीज करू नये असे आम्हाला वाटते. पण आम्ही हिंसेच्या विरोधात आहोत. 

 

का होतोय विरोध... 
- चित्रपटामध्ये अलाउद्दीन खिलजीचे महात्म्य दाखवण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. त्याची चुकीची कृत्येदेखिल अतिशयोक्ती करत दाखवली आहेत. 
- तसेच राणी पद्मिनी आणि खिलजी यांच्यात ड्रीम सिक्वेन्सही शूट करण्यात आला आहे. त्याशिवाय घूमर डान्समुळेही विरोध होत आहे. 
- चित्रपटात राजपूत समाजाची चुकीची प्रतिमा दाखवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्याचे कारण म्हणजे घूमर नृत्य पुरुषांसमोर केले जात नाही. 

 

असा सुरू झाला होता वाद..
- राजपूत करनी सेनाने याचा विरोध केला होता. त्याची सुरुवात राजस्थानमध्ये शुटिंगच्यावेळी झाली होती. या चित्रपटात पद्मापती आणि खिलजी यांच्यात इंटिमेट सीन दाखवल्याने त्यांच्या भावना दुखावल्या जातील असे करनी सेनेचे मत आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून विरोध होत आहे. करनी सेनेने अनेक ठिकाणी आंदोलन करून पुतळ्यांचे दहनही केले आहे. 
- गुजरात बीजेपीने म्हटले की, चित्रपटात क्षत्रिय समाजाच्या भावनांना ठेस पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिलीजपूर्वी हा चित्रपट राजपूत प्रतिनिधींना दाखवायला हवा. त्यामुळे रिलीजच्या वेळी तणाव टाळता येईल. 


चित्रपटाबाबत अनेक वाद असले तरी चित्रपट पाहणारे चित्रपटाबाबत काय म्हणतात हे महत्त्वाचे आहे.. चित्रपटाच्या निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वी मीडियातील काही ज्येष्ठ मंडळींसाठी खास शो आयोजिक करून मत मांडायला सांगितले होते, त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार वेदप्रताप वैदिक यांनी हा चित्रपट पाहिला.. चित्रपट पाहिल्यानंतरच्या त्यांच्या भावना वाचा पुढील स्लाइड्सवर.. यावरून तुम्हाला चित्रपटात नेमके काय दाखवले आहे याचा अंदाज येईल.. 

 

बातम्या आणखी आहेत...