आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्याने कापला शिक्षकाचा गळा, सोशल मीडियावर व्हायरल केला फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये खळबळून टाकणारी घटना घडली. पॉलिटेक्निकचे शिक्षण घेत असलेल्या एका तरुणाने शिक्षकाच्या घरात घुसून चाकूने गळा कापला. त्यानंतर शिक्षकाच्या मृतदेहासोबत सेल्फीही घेतल्या. त्यानंतर या विद्यार्थ्याने स्वत:चे आयुष्यकही संपविले. मॉस्को पोलिसांनी या प्रकरणाची सखाले चौकशी सुरु केली आहे. मात्र या घटनेनंतर मॉस्को शहरात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
 
सोशल मीडियावर शेअर केले मृतदेहाचे फोटो...
- शिक्षकाला मारण्यासाठी आंद्रे एमिलयानिकोव नावाच्या विद्यार्थ्याने कटर खरेदी केले होते. मात्र आता शिक्षकाचा खून करण्यासाठी त्याने कटरचा वापर केला की नाही, हे स्पष्ट होऊ शकले नाही.
- आंद्रेने खून केल्यानंतर सोशल मीडियावर मृतदेहासोबत सेल्फी घेऊन फोटो शेअर केले. या फोटोमध्ये जमीनीवर रक्त सांडलेले दिसतेय.
- ही घटना कॉलेजमधील एका शिक्षकाने फोनवरून पोलिसांना कळविली. त्यानंतर घटनास्थळी पोलिस पोहोचले.
- पोलिसांना घटनास्थळी एक चाकू, वूड कटर आणि मृतदेह आढळून आले.
 
ऑनलाईन गेममुळे केली असावी हत्या
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंद्रेने आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर फोटोसह नोव्हेंबर डूम नावाचे एक गाणेही पोस्ट केले होते. ही घटना ब्लू व्हेल सारख्या गेममुळे झाल्याची शक्यताही पोलिसांनी वर्तविली आहे.
 
शिक्षकाने दिली होती धमकी
- मीडिया रिपोर्टनुसार, दोन आठवड्यापासून आंद्रे कॉलेजमध्ये येत नव्हता. त्यामुळे शिक्षकाने त्याला काढून टाकण्याची धमकी दिली होती. या कारणामुळे आंद्रेने शिक्षाचा खून केल्याचा संशय पोलिसांना आहे.
- कॉलेज स्टाफने सांगितले की, घटनेवेळी ऑडिटोरियममधून कुठल्याही प्रकारचा ओरडण्याचा आवाज आलेला नाही. या शिक्षकाला तीन मुले असल्याचे माध्यमांचे म्हणणे आहे.
बातम्या आणखी आहेत...